Former Minister Sanjay Deotale Passes Away: संजय देवताळे यांचे निधन, कोरोना व्हायरस उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका
Sanjay Deotale | (File Photo)

संजय देवतळे (Sanjay Deotale) यांचे निधन झाले आहे. देवाताळे यांना कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाला होता. नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर कोरोनावरील उपचार सुरु होते. उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याने आज (25 एप्रिल) त्यांचे निधन (Sanjay Deotale Passes Away) झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांचे कार्यकर्ते आणि चंद्रपूर (Chandrapur ) जिल्ह्यात शोकाचे वातावरण आहे. संजय देवताळे हे गेली अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात होते. ते चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले होते. मुळचे काँग्रेस नेते असलेल्या देवताळे यांनी अलिकडेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

संजय देवताळे हे मोठा जनसंपर्क असलेले नेते म्हणून ओळखले जात. कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर ते सतत काळजी घेत असत. दरम्यान, त्यांच्या घरातील एका सदस्यास कोरोना व्हायरस संसर्ग झाला. सावधगिरीचा उपाय म्हणून देवताळे यांचीही कोरोना व्हायरस चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे संजय देवताळे यांच्यावर नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. गेली सहा दिवस हे उपचार सुरु होते. हे उपचार सुरु असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचे निधन झाले.

संजय देवताळे अल्पपरीचय

संजय देवताळे हे राज्याच्या राजकारणातील एक परिचीत नाव होते. वरोरा विधानसभा मतदारसंघातून ते 4 वेळा काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडूण गेले होते. त्यांनी पर्यावरणमंत्री आणि चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री म्हणूनही कार्यभार सांभाळला होता. दरम्यान, प्रदीर्घ राजकीय कारकीर्द काँग्रेसमध्ये काढल्यानंतर विधानसभा निवडणूक 2014 मध्ये देवताळे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पुढे विधानसभा निवडणूक 2019 मध्ये त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेनेच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक 2019 पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता.