अयोध्या राम मंदिर भूमीपूजन सोहळ्यानिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजप कार्यालयात प्रभू श्रीरामांवर गायले भजन, Watch Video
Devendra Fadnavis (Photo Credits: ANI/Twitter)

आज संपूर्ण आसमंत रामनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे. सारा देश ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहात होता तो सोहळा आज अखेर अयोध्या नगरीत संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज अयोध्येतील राममंदिराच्या पायाभरणीसाठी चांदीची वीट ठेवून भूमिपूजन करण्यात आले. कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) आज अनेक रामभक्तांना हा सोहळा तेथे जाऊन प्रत्यक्षात अनुभवता आला नसला तरीही घरात राहून त्यांना ऑनलाईन हा लाईव्ह सोहळा पाहिला. या निमित्त भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मुंबईतील भाजप कार्यालयात काही कार्यकर्त्यांसह प्रभू श्रीरामांचे नामस्मरण केले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीरामांचे भजन देखील गायले. Ram Mandir Bhumi Pujan: श्रीराम मंदिर हे भारतीय संस्कृतीचं आधुनिक प्रतिक असेल: पंतप्रधान नरेंद्र मोदी

पाहा ANI चा व्हिडिओ:

सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करुन यथासांग पूजा करण्यात आली. मुख्य भूमिपूजनाच्या मुख्य सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी पंडितांच्या मंत्रोच्चाराच्या गजरात कलशाचे पूजन करण्यात आले. राम मंदिरासाठी 9 शिळांचं मोदींच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर चांदीची वीट रचून मोदींनी रामजन्मभूमीची पायाभरणी केली. या पायाभरणीसाठी देशभरातून 2 लाख 75 हजार वीटा आल्या. त्यातील निवडक 100 वीटा राममंदिराच्या पायाभरणीसाठी वापरण्यात येणार आहे. सुवर्ण अक्षरात लिहावा असा हा ऐतिहासिक सोहळा आज संपन्न झाला.