कॉंग्रेस पक्षाचे सिल्लोड मतदार संघातील आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. कॉंग्रेस पक्षातून हाकलपट्टी करण्यात आल्यानंतर अब्दुल सत्तार भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार की शिवसेनेमध्ये याबद्दल मागीलअनेक दिवसांपासून चर्चा रंगल्या होत्या. मात्र आज गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीमध्ये 'मातोश्री'वर अब्दुल सत्तार यांच्या हातावर शिवबंधन बांधण्यात आले आहे. भाजपामध्ये स्थानिक पदाधिकार्यांच्या विरोधानंतर अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आज पक्ष प्रवेशाच्या वेळेस उद्धव ठाकरे यांनी त्यांना सिल्लोड मतदार संघाची (Sillod Constituency) उमेदवारी जाहीर केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, आज सकाळी अब्दुल सत्तार मातोश्रीवर पोहचले. यावेळेस एकनाथ शिंदेदेखील उपस्थित होते. सत्तार यांच्या हातावर शिवबंधन बांधल्यानंतर बोलताना, त्यांची सिल्लोडची उमेदवारी जाहीर करण्यात आली. सिल्लोडची जागा सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणेन असे मत यावेळेस सत्तार यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांची शिवसेनेत घरवापसी? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सिल्लोड मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/l8EkzuROZy
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) September 2, 2019
लोकसभा निवडणूक 2019 पासून अब्दुल सत्तार कॉंग्रेसवर नाराज होते. सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने नाराज सत्तारांनी त्याच्या मनातील नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. कॉंग्रेसविरोधात बंड पुकारले. यानंतर कॉंग्रेस पक्षानेही कारवाई करत अब्ब्दुल सत्तार यांची पक्षामधून हाकलपट्टी केली.