राज्याच्या पहिल्या महिला माजी मुख्य निवडणूक आयुक्त (Former Chief Election Commissioner of Maharashtra नीला सत्यनारायण (Neela Satyanarayanan) यांचे (Coronavirus) निधन झाले आहे. त्या 72 वर्षांच्या होत्या. मुंबई येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच त्यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले. त्या 1972 च्य आयएएस बॅचच्या अधिकारी होत्या. निला सत्यनाराण यांनी विविध महत्त्वाच्या सरकारी पदांवर काम केले. अत्यंत अभ्यासू, कष्ठाळू, प्रामाणिक आणि होतकरु अशी त्यांची ओळख होती.
सनदी सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही त्या समासेवेत कार्यरत होत्या. अनेक कार्यक्रम, महिलांविषयी उपक्रम आदी कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असायची. त्यांचे भाषण ऐकणे हे उपस्थितांसाठी एक पर्वणी असायची. त्या चांगल्या वक्त्याही होत्या. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहे. यात कथा, कविता आणि इतर लेखणाचाही समावेश आहे. मराठी वाचकाला नीला सत्यनाराण हे नाव अगदी परिचित आहे. सनदी सेवेत असताना आणि निवृत्त झाल्यानंतरही त्यांचे आयुष्य धकाधकीचे राहिले. लोकसंपर्क, समाजकार्य आधींमुळे त्या नेहमी जनमानसात मिसळत असत. असे असतानाही त्यांनी आपली लेखण, वाचणाची आवड जोपासली. (हेही वाचा, Coronavirus: 'नवरी नटली' फेम लोककलावंत छगन चौगुले यांचे निधन; कोरोना व्हायरस चाचणी आली होती पॉझिटीव्ह)
निला सत्यनाराण यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांतून लेखन केले. सुमारे 150 पेक्षाही अधिक कविता त्यांनी लिहिल्या. सत्यनाराण यांच्या काही पुस्तकांवर चित्रपटनिर्मितीही झाली. सत्यनाराण यांना संगिताचीही आवड होती. त्यांनी काही मराठी आणि हिंदी चित्रपटासाठी संगीद दिग्दर्शन केले आहे.
वयाच्या 37 व्या वर्षी नीला सत्यनाराण या सनदी अधिकारपदाच्या सेवेत रुजू झाल्या. त्यांनी मुलकी खाते, गृहखाते, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या पदांवर काम केले. लोकसंपर्क हा नीला सत्यनाराण यांच्या जीवनाचा भाग होता. एका मुलाखतीदरम्यान, त्यांनी सांगितलं होतं की, “लहानपणापासूनच रंगमंचावर काम करण्याची माझी इच्छा होती. मात्र, आयएसआय होण्यासाठीचे बळ पतीने दिले आणि त्यामुळे आयएसआय झाले.”. स्पष्टवक्तेपणा आणि सडेतोड मत मांडण्याबाबत त्या प्रसिद्ध होत्या.