Representational Image (Photo Credits: File Image)

New India Co-operative Bank Scam: न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्या (New India Co-operative Bank Scam) प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) माजी सीईओ अभिमन्यू भोयन (Former CEO Abhimanyu Bhoyan) यांना अटक (Arrest) केली आहे. अभिमन्यू भोजन हे या प्रकरणातील तिसरे आरोपी बनले आहेत. न्यायालयाने आरोपीला 28 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बँकेतील आर्थिक अनियमिततांच्या चालू चौकशीनंतर भोयन यांना अटक करण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांच्या कार्यकाळात हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गैरव्यवस्थापन आणि फसव्या व्यवहारांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. पोलिस या प्रकरणात आणखी तपास करत आहेत. या प्रकरणात अनेकांची चौकशी सुरू असून आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींना अटक होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा -New India Co-operative Bank Scam: एका शाखेतून दुसऱ्या शाखेत पैसे हस्तांतरित करताना हितेश मेहता मारायचा पैशांवर डल्ला; मुंबई पोलिसांचा खुलासा)

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) गेल्या आठवड्यात न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना ताब्यात घेतले होते. बँकेतून 122 कोटी रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपाखाली मेहता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक अनियमितता आणि रोखतेच्या चिंतेमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकेच्या कामकाजावर कडक निर्बंध लादल्यानंतर हितेश मेहताला अटक करण्यात आली होती.  (हेही वाचा -New India Co-op Bank Case: मुंबईमधील न्यू इंडिया को-ऑप बँकेचा महासंचालक हितेश मेहताने केला 122 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार; दादर पोलिसांनी दाखल केला गुन्हा. )

हितेश मेहता यांच्यावर 122 कोटी रुपये लाटल्याचा आरोप -

बँकेचे कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी शिशिर कुमार घोष यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर दादर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांखाली दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये मेहता यांच्यासह त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना मुख्य आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे, ज्यात महाव्यवस्थापक आणि लेखा प्रमुख म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.