Bank Fraud: बहुराष्ट्रीय बँकेच्या माजी अधिकाऱ्यास अटक, 85 वर्षीय ग्राहकाचे  9.4 कोटी रुपये स्वत:च्या खात्यात वळते केल्याचे प्रकरण
Arrests | (Photo credit: archived, edited, representative image)

Mumbai Latest News: एका बहुराष्ट्रीय बँकेच्या माजी कार्यकारी अधिकाऱ्यास अटक करण्यात आली आहे. बँकेच्या 85 वर्षीय ग्राहकाच्या खात्यावरील 9.4 कोटी रुपये परस्परच आपल्या व्यक्तीगत खात्यावर वळते करुन सदर ग्राहकाची फसवणूक (Ex-bank Exec Dupes) केल्याचा या अधिकाऱ्यावर आरोप आहे. धक्कादायक म्हणजे सदर ग्राहकास या अधिकाऱ्याने आपले पैसे विविध शेअर बाजारात विविध समभागांमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले होते, असेही समजते. रवी शर्मा असे आरोपीचे नाव आहे. मुंबईतील गावदेवी पोलिसांनी त्याला रविवारी (11 फेब्रुवारी) अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

एका बहुराष्ट्रीय बँकेचे माजी कार्यकारी, रवी शर्मा, याला मुंबईतील गांवदेवी पोलिसांनी फसवणूक प्रकरणी अटक केली आहे. बँकेच्या 85 वर्षीय ग्राहकाच्या खात्यातून चार वर्षांच्या कालावधीत 9.4 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सांगितले जात आहे की, आरोपीने सदर ग्राहकास शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले होते. आरोपी शर्मा हा बँकेमध्ये वरिष्ठ दावर व्यवस्थापक म्हणून काम करत होता. त्याने कथितपणे आपल्या पदाचा गैरवापर करून वयोवृद्ध ग्राहकाची फसवणूक केली. ज्याद्वारे आर्थीक घोटाळा झाला. (हेही वाचा, Bombay HC On RBI Fraud Bank Order: रिझर्व्ह बँकेच्या बँकांच्या फसवणूक खात्यांबाबतच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिरीत)

अटक आणि कायदेशीर कार्यवाही:

निधीचा गैरवापर करणे आणि वैयक्तिक फायद्यासाठी त्याच्या ग्राहकांच्या विश्वासाचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली रवी शर्मा याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याने शर्मा याला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली. पोलिसांची मागणी मान्य करत शर्मा याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या कारवाईनंतर वृद्ध ग्राहकांचे होत असलेले आर्थिक शोषण आणि असुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (हेही वाचा, Mumbai Shocker: दादर स्थित महिलेची 47 हजारांची फसवणूक; चेक क्लोन, स्वाक्षरीची नक्कल करून घातला गंडा)

कथित फसवणुकीचा कालक्रम:

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा याने 2019 ते 2023 दरम्यान स्टॉक गुंतवणुकीच्या बहाण्याने विविध कागदपत्रे आणि फॉर्मवर स्वाक्षरी करण्यासाठी वयोवृद्ध ग्राहकाची दिशाभूल केली. आपल्या पदाचा आणि ग्राहकाच्या विश्वासाचा फायदा घेत शर्माने खोटेपणा दाखवत आपल्या वैयक्तिक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम वळती केली. तत्पूर्वी त्याने पीडिताला भरघोस परताव्याचे आमिष दाखवत त्याची दिशाभूल केली.

अटकेबाबत कायदेशीर वाद:

शर्मा याच्या वतीने बचाव पक्षाचे काम पाहात असलेले वकील राहुल अग्रवाल यांनी दावा केला की, सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या प्रक्रियात्मक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करताना त्यांच्या अशिलाची अटक बेकायदेशीरपणे करण्यात आली. डीके बसू आणि अर्नेश कुमार यांच्या निकालांमध्ये नमूद केलेल्या प्रस्थापित कायदेशीर प्रोटोकॉलचे उल्लंघन करून, कोर्टासमोर हजर होण्यापूर्वी शर्माची अटकेची 24 तासांची मर्यादा ओलांडली असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.