Food Poisoning in Nanded: नांदेड मध्ये प्रसादामधून विषबाधा; 100 जणांना उलट्यांचा त्रास
Food Poisoning | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

नांदेड मध्ये एका मंदिरातील प्रसादाच्या जेवणामधून भाविकांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये 100 पेक्षा अधिक जण आजारी पडल्याची माहिती समोर आली आहे. विषबाधा झालेल्या भाविकांवर ग्रामीण रूग्णालय नायगाव इथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. लालवंडी गावामध्ये एका शेतकर्‍याच्या शेतामधील शिव शंकराच्या मंदिरामध्ये हा प्रकार घडला आहे. प्रसादामध्ये वरण, भात आणि अंबिल असा एकत्र प्रसाद दिला असता त्याचे सेवन करून अनेकांना त्रास होऊ लागला.

उलट्यांचा त्रास होऊ लागल्यानंतर तातडीने त्यांना ग्रामीण रूग्णालयामध्ये हलवण्यात आले त्यानंतर चिंताजनक प्रकृती असलेल्यांना नांदेड मध्ये रूग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी या घटनेची दखल घेत या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. रात्री उशिरापर्यंत 90 पेक्षा जास्त जणांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. तर सुदैवाने या सार्‍यांची स्थिती उपचारानंतर ठीक असून ते स्थिर आहेत. Nanded Food Poisoning: नांदेड जिल्ह्यात भगर खाल्ल्याने विषबाधा, 60हून अधिक नागरिकांची प्रकृतीत बिघाड .

ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अन्नातून विषबाधेच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेकदा अन्न खराब होते आणि त्यामधून अशा विषबाधेच्या घटना होतात.