कोरोनाबाधित (COVID19) रुग्णांच्या उपचाराकरिता महत्वपूर्ण ठरत असलेल्या रेमडेसीवीर (Remdesivir) या औषधासाठी बाजारात मोठी मागणी वाढली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, नवीमुंबई यांसारख्या परिसरात रेमडेसीवीर औषधाचा काळाबाजार करुन गरजू रुग्णांकडून गैरकायदेशीर भरमसाठ पैसे उकळणाऱ्या टोळीचा अन्न व औषध प्रशासन विभागासोबत (Food and Drug Administration) संयुक्त कारावाई करून गुन्हे शाखा युनिट-7 यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत 7 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 13 रेमडेसीवीर इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत.
कोविड19 चा पादुर्भाव झालेल्या रुग्णांवर उपचाराकरिता महत्वपूर्ण व मागणी असलेल्या रेमडेसीवीर या औषधाचा काळाबाजार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सुचनेनुसार वरिष्ठांनी संबंधीतावर कारवाई करण्याचे निर्देश गुन्हे शाखेस तसेच संबधीत विभागास दिले आहेत. रेमडेसीवीर इंजेक्शनची खरी किंमत 5 हजार 400 रुपये आहे. मात्र, बाजारात काहीजण रेमडेसीवीर इंजेक्शनची विक्री पाचपट जास्त दराने म्हणजे 30 हजार रुपये किंमतीने करित आहेत, अशी माहिती एका गुप्त बातमीदारामार्फत अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट-7 मधील अधिकाऱ्यांनी बोगस ग्राहकांच्यामार्फत आरोपींशी संपर्क साधून रेमडेसीवीर या औषधाचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. हे देखील वाचा- कोविड-19 संकटात Remdesivir चा काळा बाजार रोखण्यासाठी राज्य सरकारने खरेदी केल्या औषधाच्या 60,000 बाटल्या
एएनआयचे ट्वीट-
Maharashtra: Food and Drug Administration (FDA) busted a racket involved in black marketing of Remdesivir last night in Mumbai. Seven persons have been arrested and 13 vials of Remdesivir have been seized so far. pic.twitter.com/Spx9yqFHwR
— ANI (@ANI) July 19, 2020
महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना रेमडेसीवीर या कोरोनावरील औषधाचा काळा बाजार रोखण्यासाठी राज्य सरकारने 60,000 औषधांच्या बाटल्या मागवल्या आहेत. या औषधाच्या एका बाटलीसाठी तब्बल 3 हजार 392.48 रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशांनंतर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने याची ऑर्डर दिली आहे.