Flood-Like Situation (Photo Credit: ANI)

महाराष्ट्राला (Maharashtra) या वर्षीच्या पावसाने (Heavy Rainfall)  चांगलेच झोडपून काढले आहे. यामुळे अनेक नागरीक त्रस्त झाले आहेत. नोव्हेंबर महिना आला तरीदेखील पाऊसाच्या सरी कोसळतच आहेत. नाशिक (Nashik) येथे आज मुसळधार पावसाने सुरुवात केली असून 350 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या शहरात शुक्रवारी रात्री 2 वाजल्यापासून पांझन नदीला आलेल्या पुराच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक शहरासह मनमाड आणि मालेगावमधील नागरिकांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. एएनआयने वृत्त संस्थेने नाशिक मनमाड आणि मालेगावमधील पूरसदृश परिस्थितीचे फोटो टिपून शेअर केले आहेत.

यावर्षीच्या पावसाने सर्वांच्या मनात एकच भिती निर्माण केली आहे. मुसळसार पावसामुळे गेल्याकाही दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली या शहरात भयंकर पूर आला होता. त्यावेळी कोल्हापूर, सांगली येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच गेल्या 30 वर्षाच्या तुलनेत यावर्षी अधिक पाऊस कोसळला आहे. महत्वाचे म्हणजे, ऑक्टोबर महिन्याचा शेवट झाला तरीदेखील पाऊसाने विश्राम घेतला नाही. यामुळे नागरीकही पूर्णपणे वैतागून गेले आहेत. यातच शुक्रवारी मध्यरात्री नाशिक शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिक या परिस्थितीचा सामना करत असून पावसाने सध्या काहीवेळेसाठी विश्रांती घेतली आहे. हे देखील वाचा- अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने सरकारकडून 10 हजार कोटींची मदत

एएनआयचे ट्विट-

मुंबईतही शुक्रवारी पावसाने हजेरी लावली आहे. काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाचक्रीवादळाचे सावट उभे राहिले होते. दरम्यान, गेले दोन दिवस वातावरणात अचानक बदल झाला आहे. शुक्रवारी सकाळी काही ठिकाणी सूर्यदर्शन झाले तर, काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली.