Photo Credit- X

Gadchiroli Rain Update: गेल्या चार दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain)सुरू आहे. राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. सर्व विभागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. गडचिरोली (Gadchiroli Rain)जिल्ह्यातील पूरस्थिती मात्र चौथ्या दिवशी सावरलेली नाही. मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्ववत झालेले नाही. जिल्ह्यात तीन राष्ट्रीय महामार्गांसह 23 प्रमुख मार्ग अजूनही वाहतूकीसाठी बंद आहेत. सतर्कतेचे पाऊल म्हणून रस्त्यावर पोलीस प्रशासनांकडून बॅरिकेट्स देखील लावण्यात आले आहेत. (हेही वाचा:Potholes on Pusad Roads: पावसामुळे रस्त्यांवर खड्डेच खड्डे, जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास; पुसद नगरापालिकेवर टीका (Watch Video))

शेतांमध्ये पाणी साचले असून शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या सर्व परिस्थितीमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर (Gadchiroli) जिल्ह्यातून गेलेले महामार्ग देखील रहदारीसाठी बंद करण्यात आले आहेत. विदर्भात पावसाचा हाहाकार सुरु आहे. मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या (heavy Rain) मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. पाऊस जोरदार असल्याने सलग दोन दिवस शाळा, महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली होती. गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे वैनगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळे वाहन धारकांचे प्रचंड हाल होत आहेत.

जिल्ह्यातून गेलेले प्रमुख राष्ट्रीय महामार्ग बंद आहेत. यात 23 मार्ग आजही बंद आहेत गडचिरोली- चामोर्शी, गडचिरोली- नागपूर, आष्टी- आल्लापल्ली या मार्गांचा समावेश आहे. पुरामुळे भाजीपाला, दूध, ब्रेड अशा आवश्यक गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला आहे.