वॉलमार्टचे फ्लिपकार्ट मार्केटप्लेस (Walmart's Flipkart Marketplace) आणि भारतातील PhonePe पेमेंट व्यवसायात $100 अब्ज एंटरप्राइजेस बनण्याची क्षमता आहे. ज्याला आगामी काळात वाढीसाठी पोषक वातावरण आहे, असे किरकोळ विक्रेत्याचे मुख्य वित्तीय अधिकारी जॉन डेव्हिड रेनी (John David Rainey) यांनी म्हटले आहे. ते एका गुंतवणूकदार परिषदेत बोलत होते. या परिषदेत बोलताना त्यांनी Flipkart आणि PhonePe च्या कामगिरीवर प्रकाश टाकला. वॉलमार्टचे विदेशी बाजारपेठेतील एकूण व्यापाराचे प्रमाण येत्या पाच वर्षात दुप्पट करुन ते $200 अब्ज पर्यंत पोहोचविण्याचे उद्दीष्ठ असल्याचे ते म्हणाले. वॉलमार्ट फ्लिपकार्ट आणि PhonePe साठी विशिष्ट विक्रीचे आकडे उघड करत नसले तरी, अलीकडच्या काही महिन्यांत कंपनीचे अधिकारी या दोन व्यवसायांचे महत्त्व अधोरेखित करतात, असे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. वॉलमार्टच्या आंतरराष्ट्रीय प्रमुखांनी यापूर्वी भारताच्या 1.4 अब्ज लोकसंख्येचा उल्लेख रिटेल दिग्गजांसाठी "महत्त्वपूर्ण" संधी म्हणून केला आहे.
सर्वात अलीकडील तिमाही 30 एप्रिल रोजी संपली. या तिमाहीत वॉलमार्टने फ्लिपकार्ट व्यवसायासाठी दोन अंकी विक्री वाढ नोंदवली. ही वाढ अनेक शहरांमध्ये नवीन खरेदीदारांच्या संपादनामुळे आणि जाहिरातींच्या विक्रीत भरीव 50 टक्के वाढीमुळे झाली. Flipkart, 2022 मध्ये $40 अब्ज पेक्षा जास्त मूल्य असलेले, भारतातील सर्वात मौल्यवान स्टार्टअप्समध्ये आहे,असेही जॉन डेव्हिड रेनी यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Secure Digital Economy a Global Challenge: डिजिटल अर्थव्यवस्थेतील सुरक्षा हे जागतिक आव्हान, त्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज- Minister Rajeev Chandrasekhar)
जॉन डेव्हिड रेनी यांनी पुढे बोलताना सांगितले की, वॉलमार्टला PhonePe च्या कामगिरीबद्दलही विशेष आनंद आहे. पेमेंट व्यवसायाने $1 ट्रिलियनचे वार्षिक पेमेंट मूल्य प्राप्त केले. भारतातील एक अत्यंत लोकप्रिय रिअल-टाइम पेमेंट पद्धत म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसद्वारे (UPI) सुलभ झाले. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार डिसेंबरपर्यंत, पेमेंट मार्केटमध्ये PhonePe चा 46 टक्के वाटा होता. जो यापुढेही आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ट्विट
.@Flipkart and @PhonePe could be $100 billion businesses in India led by strong growth, believes Walmart's chief financial officer John David Rainey.https://t.co/jXxzTvChEN
— Mint (@livemint) June 15, 2023
दरम्यान, PhonePe कडे 400 दशलक्ष नोंदणीकृत ग्राहकांचा प्रभावशाली वापरकर्ता आधार आहे. भारतातील सर्वात मौल्यवान पेमेंट स्टार्टअप म्हणून आपली स्थिती मजबूत करण्यासाठी, वॉलमार्टने मार्चमध्ये PhonePe मध्ये अतिरिक्त $200 दशलक्ष गुंतवले. ज्यामुळे व्यवसायाचे मूल्य $12 अब्ज होते. रेनी म्हणाले, "भविष्यात हे दोन्ही व्यवसाय $100 बिलियन एंटरप्राइझ बनतील याबद्दल दुमत नाही.