हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर (फोटो सौजन्य- फेसबुक)

जोगेश्वरी (Jogeshwari) येथे उभारण्यात आलेले हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर (Balasaheb Thackeray Trauma Care Center) मध्ये सात जणांवर मोतीबिंदूची शस्रक्रिया (Cataract operation) करण्यात आली होती. त्यापैकी पाच जणांना अंधत्व आल्याचा आरोप भाजप (BJP) नगरसेवक अभिजित सामंत यांनी स्थायी समितीमध्ये केला आहे.

बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलगर्जीपणाचा कारभार सुरु असल्याचा आरोप अभिजित सावंत यांनी केला आहे. तसेच मोतीबिंदूची शस्रक्रिया केलेल्या सात पैकी पाच रुग्णांना अंधत्व आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच शस्त्रक्रिया विभागात अस्वच्छता असल्याने जंतुसर्ग होऊन रुग्णांची दृष्टी गेली असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे.

4 जानेवारी रोजी सात रुग्णांवर मोतीबिंदूची शस्रक्रिया करण्यात आली होती. परंतु जंतुसर्ग झाल्याने सर्व रुग्णांना केईएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु पाच रुग्णांना अंधत्व आले आहे.