Pune Metro ची 'ट्रायल रन' यशस्वी; वनाज कारशेड ते आयडियल कॉलनी मार्गावर धावली ट्रेन
Pune Metro| PC: Instagram /Pune Metro Project

पुणेकरांना प्रतिक्षा असलेल्या 'पुणे मेट्रो' (Pune Metro) ची आज ट्रायल्स पार पडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितिमध्ये या ट्रायल्सला हिरवा कंदिल देण्यात आला. वनाज कारशेड ते आनंदनगर मार्गावर झालेली ही ट्रायल्स यशस्वी ठरली आहे. ही ट्रायल केवळ तांत्रिक चाचणी असल्याने यामध्ये कुणीही व्यक्ती उपस्थित नव्हती. दरम्यान अजित पवारांनी या वेळी मेट्रोच्या कोचच्या प्रतिकृतीचे देखील अनावरण केले.

आज सकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये अजित पवारांसोबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, महामेट्रोचे एमडी ब्रीजेश दीक्षित हे यावेळी उपस्थित होते. पुणे मेट्रो या वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत वनाज ते गरवारे कॉलेज दरम्यानच्या सुरू होईल, असा विश्वास महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रीजेश दीक्षित यांनी व्यक्त केला. दरम्यान हा 5 किलो मीटरचा टप्पा आहे.

पुणे मेट्रो ट्रायल रन

दरम्यान लोकांची गर्दी टाळून हा कार्यक्रम पार पाडण्याचा मानस असल्याने सकाळी लवकर ही ट्रायल रन घेतली गेल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. या मेट्रोच्या कामादरम्यान नागरिकांनी थोडा त्रास देखील सहन केला त्याबद्दल धन्यवाद मानताना अजित पवारांनी पुण्याच्या आधुनिक इतिहासात मेट्रोची नोंद होईल अशा विश्वास व्यक्त केला आहे.