Fire | Pixabay.com

मुंबई (Mumbai) मध्ये गोरेगाव भागात मध्यरात्री 3 च्या सुमारास इमारतीच्या पार्किंग मध्ये आग भडकल्याचा प्रकार समोर आला आहे. या भीषण आगीमध्ये (Fire) 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अग्निशमन दलाने 46 जणांना बाहेर काढलं असून 39 जणांवर कूपर आणि हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये सध्या अग्निशमन दलाला यश आलं आहे. त्यांच्याकडून आता कुलिंगचं काम सुरु आहे. दरम्यान ही आग नेमकी का भडकली याच कारण समजू शकलेले नाही. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक आगीच्या कारणाचा तपास करत आहेत.

गोरेगाव पश्चिम भागात असलेल्या जी रोड वरील जय भवानी इमारतीला आग लागली होती. G+5 इमारतीमध्ये लागलेली ही आग लेव्हल टू ची होती. रात्रीच्या वेळी झोपेत असल्याने अनेकांना आग लागल्याचं कळायला उशिर झाला त्यामध्ये होरपळून अनेकांना मृत्यू झाला.

पहा ट्वीट

दरम्यान बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, आगीतून जखमी अवस्थेत बाहेर काढलेल्या काही नागरिकांची प्रकृती चिंताजनक आहे. आगीत तळमजल्यावरील काही दुकानं आणि गाड्या जळून खाक झाल्या आहेत.