मुंबई: जोगेश्वरी मधील शांतीवन सोसायटीच्या रहिवाशी इमारतीत भीषण आग, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

जोगेश्वरी (Jogeshwari)  येथील मिल्लत नगर (Millat Nagar)  परिसरात स्थित शांतीवन सोसायटीच्या (Shantivan Society) रहिवाशी बिल्डिंगला काही वेळापूर्वी भीषण आग लागल्याचे समजत आहे. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. सुदैवाने या आगीत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे समोर आलेले नाही. दरम्यान अग्निशमन दलाच्या पथकाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत

ANI ट्विट

या आजचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, सविस्तर वृत्त थोड्याच वेळात हाती येईल.