![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/oshiwara-fire-breakout.jpg?width=380&height=214)
मुंबई येथील ओशिवारा (Oshiwara Fire Breakout) परिसरात असलेल्या लाकडी गोदामाला मंगळवारी (11 फेब्रुवारी 2025) दुपारी 12. 30 च्या दरम्यान भीषण आग (Oshiwara Wooden Warehouse Fire Breaks Out) लागली आहे. ओशिवारा जोगेश्वरी वेस्ट परिसरातील कबरस्तान परिसरात असलेले हे लाकडी गोदाम रहदारी आणि गर्दीच्या ठिकाणी आहे. गोदामात लाकडी वस्तू आणि साहित्य असल्याने मोठ्या प्रमाणावर आग भडकली आहे. ज्याची झळ आजूबाजूच्या सात ते आठ दुकानांना लागली आहे. अग्निशमन दलाते जवान आणि सहा ते सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यासोबत मुंबई पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे. आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवत हानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, आगीचे कारण समजू शकले नाही.
आग लागली कशी? याबाबत उलटसुलट चर्चा
ओशिवारा परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरु आहेत. ही कामे रस्त्ये आणि महापालिकेकडून सुरु आहेत. त्यासोबतच खासगी विकासकही मोठ्या प्रमाणावर इमारती आणि इतर बाबींचा विकास करत आहेत. त्यातून स्थानिक नागरिकांचा आक्रमक विकास पद्धतीला विरोध आहे. असे असतानाच ही विकासकामे सुरु आहेत. इतकेच नव्हे तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक काळजीही घेतली जात नाही असा आरोप केला जातो आहे. विकासकांनी दाखवलेल्या निष्काळजीपणामुळेच ही आग लागल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे. तर, दुसऱ्याबाजूला ही आग लागली की, लावली गेली? असाही सवाल उपस्थित होतो आहे.
आगीमुळे परिसरात धुराचे लोट
परिसरात मोठ्या प्रमाणावर रहदारी
ओशिवारा परिसर रहदारीचा म्हणून ओळखला जातो. याच परिसरा मेट्रो स्थानकही आहे. त्यामुळे रस्ते आणि मेट्रो वाहतूकही सुरु असते. त्यातच परिसरातील रस्ते, फुटपाथ अतिक्रमण आणि वाहन पार्किंग झाल्याने बेपत्ता आहेत. सामान्य नागरिकांना चालण्यासही जागा नसते इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पार्किंग केलेले असते. त्यातच परिसरात छोटे व्यवसायिक आणि दुकानांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यामध्ये वैध आणि अवैध दुकाने, व्यवसाय आणि इमारतींचा समावेश आहे. परिणामी आग लागणे किंवा इतर तत्सम दुर्घटना अनेकदा घडल्याचे पाहायला मिळते.