Fire breaks out at Mallak Specialty Company: महाड एमआयडीसीतील मल्लक स्पेशालिटी कंपनीला भीषण आग
Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

रायगड जिल्ह्यातील (Raigad Distric) महाड औद्योगिक वसाहतीमधील (Mahad MIDC) मल्लक स्पेशालिटी (Mallak Specialty Company) कंपनीला भीषण आग (Fire breaks out at Mallak Specialty Company) लागली आहे. आग लागल्याची माहिती कळताच महाड एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे. बुधवारी (8 फेब्रुवारी) सकाळी भडकलेल्या या आगीचे नेमके कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. मात्र, कंपनीतील एका विभागात मोठा स्फोट झाल्याचे कामगारांनी ऐकले त्यानंतर पुढच्या काहीच वेळात कंपनीत मोठ्या प्रमाणार आग भडकल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

मल्लक स्पेशालिटी ही कंपनी महाड एमआयडीसी येथे रंग निर्मितीचे काम करते. रंगनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर सरायनांचा वापर केला जातो. त्यामुळे ही कंपनी रासायनिक रसायनांचा साठा करते. या साठ्यात इथेनॉल ऑक्साईडचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. त्याचाच स्फोट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग इतकी भीषण आहे की, परिसरात धुरांचे लोट आकाशात उडत आहेत. त्यामुळे परिसरात काळोखी पसरली आहे. याशिवाय आगीच्या ज्वाळांनी परिसरही तापला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर घबराट पसरली आहे. (हेही वाचा, Turbhe Fire: तुर्भे येथील डम्पिंग यार्डला भीषण आग; अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल (Watch Video))

कंपनीतील ज्वालाग्राही पदार्थांनी पेट घेतल्याने आग मोठ्या प्रमाणावर भडकत आहेत. दरम्यान, आगिमध्ये वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होत असली तरी, कोणत्याही प्रकारे जीवित हानी झाल्याचे वृत्त अद्यापपर्यंत तरी नाही. कंपनीतील कामगार आणि स्थानिक सांगत आहेत की कंपनीत मोठ्या प्रमाणावर रासायनिक साठा आहे. त्यातच रंगांचाही साठा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे जोपर्यंत हा साठा जळून खाक होत नाही. तोपर्यंत आगिवर नियंत्रण मिळवणे कठीण आहे. अग्निशमन दलाचे पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.