Rajan Salvi | (Photo Credit: Facebook)

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या रत्नागिरी (Ratnagiri) मधील घरी आज एसीबीकडून (ACB) पुन्हा छापेमारी करण्यात आली आहे. यापूर्वी 6 वेळेस ते एसीबी चौकशीसाठी अलिबागच्या ऑफिसमध्ये दाखल झाले होते. मीडीया रिपोर्ट्सनुसार, आज एसीबी चौकशीनंतर राजन साळवी यांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पन्नापेक्षा 118% जास्त संपत्ती असल्याचा उल्लेख त्यामध्ये करण्यात आल्याचं नोंदवण्यात आलं आहे.

राजन साळवी यांच्या मालमत्तेबाबत एसीबीकडून चौकशी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबाची देखील चौकशी झाली आहे. एसीबीकडून राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील हॉटेलचं मूल्यांकन करण्यात आलं होतं. त्यात घर आणि हॉटेलच क्षेत्रफळ, एकूण जमिनीची किंमत, तसेच इंटरियर डिझाईनिंग अर्थात सजावटीसाठी करण्यात आलेला खर्च यांचं मूल्यांकन करण्यात आलं आहे. नक्की वाचा: khichdi Scam: शिवसेना (UBT) आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय Suraj Chavan ला अटक; बीएमसी कोविड सेंटर खिचडी घोटाळ्याप्रकरणी ED ची कारवाई .

राजन साळवी यांनी प्रतिक्रिया देताना कितीही काहीही झालं, अटक झाली तरीही अशा कारवायांसमोर झुकणार नाही आणि ठाकरे गटाची, उद्धव ठाकरेंची साथ आपण सोडणार नाही असं म्हटलं आहे. तसेच 'राजकीय सुडातून कारवाई होत आहे. मी त्यांचे स्वागत केले आहे. अटकेला मी घाबरत नाही. मला हे अपेक्षित होतं. पण, अधिकाऱ्यांना सहकार्य करणार आहे.' असेही ते म्हणाले आहेत. राजन साळवी हे राजापूर विधानसभेचे आमदार आहेत.