Filed Case Against Narayan Rane: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणानंतर भाजप नेते नारायण राणे यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी सुरुवातीपासून उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. ऐवढेच नाही तर वैयक्तिक पातळीवर जाऊन ही काही गोष्टी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलल्याचे दिसून आले. याच कारणास्तव आता नाराणय राणे यांच्या विरोधात अपशब्द वापल्याचा आरोप लावत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण राणे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी बेईमानी करत मुख्यमंत्री पद मिळवल्याचा घणाघात केला. तसेच उद्धव ठाकरे हे दोन्ही बाजुला जाणारे गांडुळ अशा अत्यंत वाईट शब्दात ही त्यांच्यावर टीका केली. ऐवढेच नाही तर पुन्हा आमच्यावर किंवा भाजपवर टीका केल्यास गेल्या 39 वर्षात जे काही पाहिले आणि अनुभवले ते बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा नारायण राणे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना दिला. याशिवाय अन्य काही गोष्टी सुद्धा नारायण राणे यांनी बोलून दाखवल्याचा आरोप बार्शीतील शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी केला. याच कारणामुळे नारायण राणे यांच्या विरोधात कायद्याच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज करण्यात आले होते. तसेच जर पोलिसांनी यावर कोणताही कारवाई न केल्यास नारायण राणे यांचा पुतळा जाळला जाईल अशा इशारा देण्यात आला. त्यानंतर आता बार्शी येथील पोलीस स्थानकात नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हाची नोंद केली गेली आहे.(Rane Vs Thackeray: 'उद्धव ठाकरे' यांनी बेईमानी करून पद मिळवल्याचा' नारायण राणे यांचा पलटवार)
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्याच्या वेळी नारायण राणे यांचा बेडूक आणि त्यांची दोन पिल्ले असा उल्लेख केल्याचे दिसून आले. तसेच कोरोनाच्या काळात राज्यातील मंदिरे उघडली गेली नसल्याने आम्हाला हिंदुत्वाबद्दल प्रश्न विचारत होते. पण ज्यावेळी बाबपरी मस्जिद पाडली त्यावेळी तेव्हा शेपट्या घालून बसल्याचे ही उद्धव ठाकरे यांनी विधान केले होते. दसऱ्या मेळाव्याला उद्धव ठाकरे यांनी फक्त नारायण राणे नव्हे तर विरोधी पक्षातील अनेक नेते मंडळींवर जहरी टीका केली.