देवेंद्र फडणवीस (Photo credit : youtube)

राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये चार महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. उद्या बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे, या पार्श्वभूमीवर शासनाने बाळासाहेबांच्या स्मारकासाठी 100 करोड रुपयांची मंजुरी दिली आहे. तसेच पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजला विद्यापीठ म्हणून मान्यता मिळाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (22 जानेवारी) झालेल्या बैठकीत हे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

बैठकीत घेण्यात आलेले निर्णय –

> श‍िवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्राचे अभ‍िवादन म्हणत, त्यांच्या स्मारकासाठी शासनाने 100 करोड रुपयांची मंजुरी दिली आहे. दादर येथील महापौरांच्या निवासस्थानाच्या जागेवर हे स्मारक उभारण्यात येणार आहे.

> दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) मोफत उपलब्ध करण्याचा निर्णय.

> महिला सुरक्षितता पुढाकार योजना मुंबईत राबविण्यास मान्यता. ही योजना देशातील 8 शहरांमध्ये राबवली जाणार आहे. 252 कोटींचा हा प्रकल्प असणार आहे.

> राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत फर्ग्युसन कॉलेज या स्वायत्त संस्थेचे रूपांतर फर्ग्युसन युनिव्हर्सिटीमध्ये करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या कॉलेजची स्थापना १८८५ साली लोकमान्य टिळक व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने झाली होती.