‘येवले अमृततुल्य चहा’ मध्ये भेसळ होत असल्याचे झाले सिद्ध; पहा काय आहे चहाच्या लाल रंगामागचे रहस्य...
Yewale Amruttulya (Photo Credits: Facebook)

मुंबई आणि पुण्यातील चहा प्रेमींसाठी सध्या ‘येवले अमृततुल्य चहा’ हा ब्रँड सध्या भलताच प्रसिद्ध आहे. 10 रुपयात मिळणार हा चहा कोणाच्याही खिशाला परवडणारा आहे. परंत, तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की या प्रसिद्ध अशा येवले चहामध्ये भेसळ असल्याचे नुकतंच सिद्ध झालं आहे.

केंद्रसरकारच्या प्रयोगशाळेने सादर केलेल्या अहवालानुसार, येवले चहाच्या ब्रँडमध्ये सिथेंटिक फूड कलर आढळून आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) येवले चहाचे काही नमुने जप्त केले होते. त्यातील काही नामने योग्य आढळून आले तर काही नमुन्यांमध्ये सिथेंटिक फूड कलर आढळून आला आहे. आणि अन्न आणि औषध प्रशासनाचे असे म्हणणे आहे की या फूड कलरमुळे चहाला लाल रंग येतो.

याआधीही, येवले चहाचा ब्रँड अडचणीत आला होता. कारण अन्न आणि औषध प्रशासनाने या ब्रँडवर  कारवाई करत ‘येवले अमृततुल्य चहा’चे राज्यभरातील उत्पादन तसेच विक्री बंद ठेवण्याचे आदेश एफडीएने दिले होते.

इतकंच नव्हे तर लोकांची दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्यामुळे देखील ‘येवले चहा’ या ब्रँडला नोटीस बजावण्यात आली हेती. त्या जाहिरातीत नमूद केल्यानुसार चहा तयार करण्यासाठी मिनरल वॉटर वापरलं जातं. परंतु, हा दावा खोटा असल्याचा एफडीआयने सिद्ध केले होते.

Johnson & Johnson च्या बेबी शाम्पू मध्ये आढळले हानिकारक रसायन, 'विक्री बंद करा' बाल अधिकार आयोगाची मागणी

दरम्यान, येवले चहाचा इतिहास पाहता, पुण्यात त्यांचे पहिले आउटलेट सुरु झाले. परंतु, अल्पावधीतच या चहाने पुणेकरांचे मन जिंकले आणि या चहाचा प्रसार वाढत गेला. आता या चहाचे आउटलेट, मुंबई तसेच ठाण्यातही सुरु करण्यात आले आहेत.