Car Accident | (Photo credit: archived, edited, representative image)

Mumbai Agra Highway Accident: मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. आयशर ट्रक आणि कारची एकमेकांना धडक झाली आणि हा अपघात घडला. अपघातानंतर रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. अपघाताची मालिका सुरु असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. (हेही वाचा- भुसावळ-नंदुरबार ट्रेन वर अमळनेर जवळ अर्धा तास दगडफेक; प्रवासी सुखरूप

मिळालेल्या माहितीनुसार, आयशर ट्रक आणि कारची एकमेंकांना धडक लागली. ही धडक इतकी भीषण होती की, कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. रहमान सुलेमान तांबोळी, अरबाज तांबोळी, सीज्जू पठाण, अक्षय यादव, अशी मृतांची नावे समोर आली आहे. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी चौघांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात मृत झालेला रहमान यांचे महिन्याभरापूर्वींच साखरपूडा झाला होता.

आयशर ट्रक नाशिक आडगावच्या दिशेने जात होते. ट्रक वेगाने येताच, त्याचा टायर फुटला आणि गाडी अनियंत्रित झाली. ट्रक दुसऱ्या लेनमधील कारवर जाऊन आढळली. या धडकेत कारमधील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातानंतर रस्त्यावर वाहतुक कोंंडी निर्माण झाली. अपघातात ट्रक चालक आणि क्लीनर गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.