शेतकऱ्यांची कर्जमाफी, शासकीय केंद्रे सुरु करण्याचा प्रस्ताव तसेच शेतीमालाला हमीभाव योग्य हमीभाव मिळणार अशी आश्वासने शेतकऱ्यांना नेहमीच सरकारकडून देण्यात येत आहेत. मात्र सरकारने त्यावर अजून कोणतेही पाऊल उचलेले नसल्याने शेतकरी वर्ग संतापला आहे. त्यामुळे राहुरी येथे आयोजित केलेलेल्या एका कार्यक्रमाच्या वेळी चंद्रकांत पाटील यांना शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखविले आहेत. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजक आणि प्रशासनाची धावपळ या कार्यक्रमात पाहायला मिळाली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे महाविद्यालयाच्या 50 व्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये पशुप्रदर्शन, पीक प्रात्यक्षिके अशा विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला होता. तर या कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर चंद्रकांत पाटील हे भाषणासाठी उभे राहताच तेथे उपस्थित असलेल्या काही शेतकऱ्यांनी शेतमालाला बाजारभाव कुठे आहेत? असा ठामपणे सवाल केला. त्यामुळे पोलिसांनी प्रश्न विचारणाऱ्या तीन कार्यकर्त्यांना शांततेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने शासनाने यशस्वी पावले उचलली आहेत. त्यासाठी देशातील कोट्यवधी शेतकर्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले. यामुळे योग्य पध्दतीने खत व्यवस्थापन व शेतीतील उत्पादन खर्च कमी झाला असून, महाराष्ट्र यामध्ये आघाडीचे राज्य ठरले आहे. pic.twitter.com/F4DlrqAF0k
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 15, 2018
मात्र राज्यातील एकूण 172 तालुकांमध्ये दुष्काळाचे संकट ओढावले आहे. त्यामुळे आता शेतमालाला योग्य तो हमीभाव मिळाला नाही, तर सरकार त्याची खरेदी करुन शेतऱ्यांच्या पाठीशी उभी राहिल असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमाच्या वेळी सांगितले आहे.