Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रामध्ये मागील साडे तीन महिन्यांपासून महाराष्ट्र पोलिस कोव्हिड योद्धा म्हणून लढत आहेत. दरम्यान या काळात सुमारे 54 पोलिस कर्मचार्‍यांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. आता या कोव्हिड योद्धांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने अजून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलिस दलामध्ये जण कर्मचार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना शासकीय निवासस्थान म्हणजेच पोलिस क्वार्ट्र्समध्ये कर्मचार्‍याच्या निवृत्ती वर्षापर्यंत राहण्याची मुभा आहे. त्यांना तात्काळ घर रिकामे करण्याची गरज नाही. तसेच पोलिस कर्मचार्‍याकडून सुमारे 65 लाखाची मदत दिली जात आहे.

महाराष्ट्रामध्ये दिवसागणिक कोरोनाचा विळखा वाढत आहे. अशामध्ये विविध ठिकाणी नाकेबंदी आणि इतर कामकाजासाठी ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांवर मोठा ताण आहे. त्यामध्येच त्यांना कोरोनाचादेखील धोका अधिक आहे. काल (25 जून) पर्यंत देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये आतापर्यंत 3239 पोलिसांनी कोरोना व्हायरसमुळे बळावलेल्या कोविड 19 (Covid 19) वर मात केली आहे. राज्यात अजूनही 991 पोलिसांवर उपचार सुरू आहेत. COVID 19 ने दगावलेल्या मुंबई पोलिस कर्मचार्‍याला कुटुंबाला मिळणार 65 लाखाची मदत.

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ट्वीट

महाराष्ट्रामध्येही काल (25 जून) काल 24 तासांमध्ये सर्वाधिक रूग्णसंख्येमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. आरोग्य विभगाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, काल 24 तासांत 4 हजार 841 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 192 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 47 हजार 741 वर पोहचली आहे. यापैकी 6 हजार 931 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 77 हजार 453 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.