
मुंबईत बँडच्या नावाखाली बनावट घड्याळे (Fake Branded Watch) विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश हा मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) केला आहे. मुंबई पोलिसांनी मुसाफिरखाना, फातिमा मंझील बिल्डिंग येथील एटी मार्केटमधील दुकानांवर धाड टाकून प्रसिद्ध ब्रँडची तब्बल 6 कोटी रुपयांची 1537 बनावट घड्याळे जप्त करत चार जणांना ताब्यात घेतले आहे. राडो, टिसॉट, ओमेगा, ऑडेमार्स पिगेट, ह्यू बॉस (Rado, Tissot, Omega, Audemars Piguet, Huw Boss) या प्रसिद्ध ब्रँडची ही घड्याळे आहेत. संबंधीत कंपन्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई गु्न्हे शाखा युनिट 2 ने ही कारवाई केली आहे. (हेही वाचा - Kalyan Double Murder: कल्याणमध्ये दुहेरी हत्याकांड, पत्नी नंतर मुलाचा गळा दाबून केला खून, आरोपी फरार)
या प्रकरणी घेवाराम अण्णाराम चौधरी, भावेशकुमार औखाजी प्रजापती , गणेश नारायण भारती आणि मोहम्मद शोएब अब्दुल गनी कुरेशी या संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. मुंबईत प्रसिद्ध कंपन्यांची ब्रँडेड घड्याळे अनधिकृतरित्या बनबून ती बाजारात विक्री केली जात होती. याबाबत संबंधिक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी पोलिसांकडे तक्रार जाखल केली होती. त्यावरून मुंबई गु्न्हे शाखा युनिट 2 ने मुसाफिरखाना, फातिमा मंझील बिल्डिंग येथील 9 दुकानांपर छापे टाकले.
आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम 420,482,486,487 आणि कॉपीराइट कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच बनावट घड्याळे बनवण्यात अजून कोणी सामिल आहे का याचा शोध सुरू आहे.