Sanjay Raut

Sanjay Raut on Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला भारतीय जतना पक्षाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न झाला. भाजप नेत्यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दरम्यान, भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे यांनी वापरलेला 'फडतूस' हाशब्द अतिशय सौम्य आहे. त्याउलट देवेंद्र फडणवीस हे भिजलेलं काडतूस आहे. त्यांनी उगाच आव आणू नये. राज्याच्या मंत्रिमंडळातील सगळेच मिस्ट झुके आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

शिवसेनेला धमक्या देऊ नका. आम्ही रस्त्यावरचे आणि फाटकेच लोक आहोत. आमच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही. आणि काडतुसाची भाषा तर मुळीच करु नका. खरं तर 'इडी' आणि 'सीबीआय' हेच तुमचं खरं काडतूस आहे. ते बाजूला करुन या. मग आमचे काडतूस पाहा कसं घुसतंय. आम्हाला कसील सांगता काडतूसाची भाषा. तिकडे चिनने किती घुसखोरी केली आहे ते पाहा. तिथे तुमचं काडतूस वाजतंय का पाहा, असेही संजय राऊत म्हणाले. (हेही वाचा, Uddhav Thackeray On Devendra Fadnavis: 'फडतूस गृहमंत्री लाळघोटेपणा करत 'फडणवीसी' करत फिरतो', उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल)

डॉ. मिंदे गटाच्या लोकांमुळे हे मंत्रिमंडळात अनेक लोक मिस्ट झुके झाले आहेत. ते इतके वाकले, झुकले आहेत की त्यांना महाराष्ट्रातील प्रश्नच दिसत नाहीत. हे सरकार नपुंसक असल्याचे आम्ही नव्हे उच्च न्यायालयानेच म्हटले आहे. त्यामुळे नपुंसक म्हटल्याचा राग नाही मात्र फडतूस म्हटल्याचे कसे वाईट वाटते? ठाणे येथील डॉ. मिंधे यांच्या टोळीतील गुंडांनी शिवसेनेच्या (ठाकरे गट) महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीचे कसे समर्थन होऊ शकते? रोशनी शिंदे यांच्यावर ज्या महिला गुंडाच्या टोळीने हल्ला केला त्यांच्यावर काय कारवाई झाली? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला. (हेही वाचा, Uddhav Thackeray, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे ठाण्यात, शिंदे गट समर्थकांच्या मारहाणीत जखमी रोशनी शिंदे यांची घेतली भेट)

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या इशाऱ्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, शिवसेनेला धमक्या द्यायचे प्रकार करु नका. पहिले 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला तिकीट का नाकारले ते सांगा. तुम्ही जो विज विभागात घोळ घालून ठेवलेला, भ्रष्टाचार केला त्याच्या सूरस कहाण्या दिल्ली दरबारी पोहोचल्या होत्या. म्हणूनच पक्षाने तुमचे तिकीट नाकारले, असा घणाघात राऊत यांनी केला.