मी रस्त्यावर फिरणारा मुख्यमंत्री आहे, जगामध्ये माझ्यासारखा मुख्यमंत्री पाहिलाय का?,असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जनतेला विचारला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ते बोलत होते. मी रस्त्यावर फिरणारा मुख्यमंत्री आहे. मुंबईत (Mumbai) मी नालेसफाई झाली की नाही हे अगदी स्पॉटवर जाऊन पाहतो. राज्यात कुठंही गाडी थांबव म्हटलं तरी रस्त्यावर थांबून मी प्रत्येकाला भेटतो. आजवर जगामध्ये असा मुख्यमंत्री तुम्ही कधी पाहिलंय का?, आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. आतापर्यंत बघा, आम्ही सगळं पूर्ण करतोय. हे सरकार खोटं नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (हेही वाचा - Akashvani Pune: पुणे आकाशवाणी केंद्रातील वृत्त विभाग चालूच राहणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर प्रसारभारतीने निर्णय घेतला मागे)
मला इगो नाही रस्त्यावरील कार्यकर्ता आहे. माझं आणि सरकारच एकच काम आहे. जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायचे. हे सरकार शेतकऱ्यांच आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. जाहिरातींमुळे देवेंद्र फडणवीस यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या, त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही एकदम मजबूत आहोत. ही युती एका विचाराने निर्माण झाली आहे. ती एखाद्या जाहिरातीने तुटेल इतकी ही कच्ची युती नाही. असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मागील काही महिन्यापासून इंद्रायणी नदीत प्रचंड प्रमाणात प्रदूषण असल्याचं समोर आलं आहे. या नदीत केमिकल युक्त पाणी सोडलं जात होतं. त्यामुळे आळंदीकरांच्या जीवाशी खेळ सुरु होता. त्यामुळे आता इंद्रायणी नदीचं शुद्धीकरण केलं जाणार असल्याचं मुख्यंमत्री यांनी सांगितलं. ते म्हणाले की, पाणी शुद्धीकरणाचे प्रकल्प उभारण्याच्या सूचना उद्योगमंत्री उदय सामंतांना दिलेल्या आहेत.