Tutari express (Photo credits: Instagram)

आतापर्यंत आपण अनेकदा लोकल रेल्वे गाड्यांचा मेगाब्लॉक (MegaBlock) असल्याचे अनेकदा ऐकले आहे. मात्र आता रेल्वे रूळांच्या कामासाठी एक्सप्रेस गाड्यांचा मेगाब्लॉक ठेवण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे. 20 ऑक्टोबरपर्यंत हा मेगाब्लॉक ठेवण्यात आला असून या दरम्यान ब-याच एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. यात काही रेल्वे या शनिवार आणि रविवारी बंद ठेवण्यात आल्या असून काही एक्सप्रेस या मंगळवार, गुरुवार आणि रविवारी बंद ठेवण्यात येणार आहेत.

वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी लोकमत ला दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर विभागातील दौंड ते सोलापूरदरम्यान झालेल्या दुहेरीकरणाच्या कामानंतर आता इंजिनिअरिंग विभागाकडून ट्रॅकचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी हा मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. यात पुणे-सोलापूर-पुणे ही गाडी प्रत्येक शनिवार आणि रविवार आणि साईनगर (sai Nagar)-पंढरपूर(Pandharpur)-साईनगर एक्सप्रेस ही गाडी मंगळवार, गुरुवार आणि रविवारी रद्द करण्यात आली आहे. तसेच पुणे हैदराबाद एक्सप्रेस 7,14,21,28 सप्टेंबर आणि 5,12,19 ऑक्टोबर या कालावधीत कुर्डूवाडी-पुणे या स्थानकादरम्यान धावणार नाही.

हेही वाचा- Ganeshotsav 2019: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! बाप्पाच्या विसर्जना निमित्त मध्य रेल्वेच्या 20 विशेष लोकल फे-या, या दिवशी चालविण्यात येणार या रेल्वेगाड्या

तसेच गाडी क्रमांक 71414 कुर्डूवाडी ते भिगवण या स्थानकादरम्यान दर शनिवार व रविवार ही गाडी धावणार नाही. तर गाडी क्रमांक 71415 डेमू पुणे ते भिगवण स्थानकापर्यंत धावणार आहे. गाडी क्रमांक 71414 भिगवण ते पुणे आपल्या निर्धारित वेळेवर भिगवण स्थानकावरुन सुटणार आहे. तर गाडी क्रमांक 71415 भिगवण ते कुर्डूवाडी स्थानकावरून धावणार नाही.