ED Interrogates Shiv Sena Leader Ravindra Waikar: शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांची तब्बल आठ तास चौकशी
Ravindra Waikar | (Photo Credits: Facebook)

शिवसेना (Shiv Sena) आमदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (Enforcement Directorate) म्हणजेच इडीने तब्बल आठ तास चौकशी केल्याचे वृत्त आहे. आमदार रवींद्र वायकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मर्जितले आणि विश्वासू म्हणून ओळखले जातात. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून (22 डिसेंबर) सुरु होत आहे. अधिवेशनाच्या आदल्याच दिवशी शिवसेनेच्या महत्त्वाच्या आणि त्यातही मुख्यंमत्र्यांचा विश्वासू मानल्या जाणाऱ्या नेत्याची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) चकौशी करण्यात आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. रवींद्र वायकर हे शिवसेनेचे जोगेश्वरी येथील आमदार आहेत. या मतदारसंघातून ते या आधी तीन वेळा निवडूण आले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रविंद्र वायकर यांनी सन 1014 मध्ये अलिबाग येथे जमीन खरेदी केली होती. ही जमीन खरेदी करताना पदाचा गैरवापर केला गेला. तसेच, पुढे याच जमीनी या दोघांनी आपल्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या नावे हस्तांतररित केल्या, आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याबाबत त्यांनी तशी तक्रारही दाखल केली होती. याच प्रकरणावरुन आमदार वायकर यांची ईडीद्वारे चौकशी झाल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा, Kirit Somaiya On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयांसोबत नेमके काय संबंध आहेत जाहीर करावे- किरीट सोमय्या)

मार्च महिन्यात केलेल्या तक्रारीत किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता की, ठाकरे आणि वायकर कुटुंबीयांनी मुरुड तालुक्यातील कोर्लई येथे जमीन खरेदी केली. ही जमीन खरेदी करताना जमीनीच्या दस्तऐवजात छेडछाड करण्यात आली. त्यातून वन कायद्याचा भंग झालाच. तसेच, वनजमिनीवर अतिक्रमणही झाले., असा दावा करत सोमय्या यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात 3 मार्च रोजी तक्रार नोंदवली होती. कोर्लाई येथी जमीनवर सुमारे 19 बंगले आहेत. याबाबतची माहिती उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली नाही. तसेच, महाकाली गुंफा जमीन घोटाळा प्रकरणात ठाकरे आणि वायकर कुटुंबीयांनी अविनाश भोसले व शाहीद बलवा यांच्याकडून 25 लाख रुपये मिळाल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.