कोरोनाने महाराष्ट्रसह संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट आणखी गडद होताना दिसत आहेत. ज्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. परिणामी, देशातील अनेक उद्योगधंदे, व्यवसाय आणि वाहतूकीसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ऑनलाइन रोजगार मेळावा आणि महास्वयंम बेवपोर्टलमार्फत बेरोजगारांना रोजगार (Employment) उपलब्ध करून देण्यात येत आहे. एवढेच नव्हेतर, एकट्या जुलै महिन्यात 21 हजार 572 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, असे महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य विकास,रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयंम वेबपोर्टलमार्फत एकट्या जुलै महिन्यात तब्बल 21 हजार 572 बेरोजगारांना रोजगार देण्यात आला आहे. यापुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मोहीम पातळीवर काम केले जाईल. तरी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या काळात 17 हजार 715 बेरोजगारांना रोजगार देण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात एकूण 39 हजार 287 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. कौशल्य विकास विभागाने लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाइन रोजगार मेळाव्याची जिल्हास्तरावर मोठी मोहीम सुरू केली आहे. जुलैमध्ये झालेल्या मेळाव्यांमध्ये 204 उद्योजकांनी सहभाग घेतला आहे. त्यांच्याकडील 19 हजार 78 जागांसाठी त्यांनी ऑनलाईन मुलाखती घेतल्या आहेत. या मेळाव्यामध्ये 18 हजार 153 नोकरीइच्छुक तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी 1 हजार 651 तरुणांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी उर्वरित तरुणांमधून निवड प्रक्रिया सुरू आहे. सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. हे देखील वाचा- 26/11 Mumbai attack: मुंबईतील 26/11 हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देविका रोटावनकडून सरकारकडे मदतीसाठी आवाहन
नोकरी इच्छूक तरुणांना https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर आधार क्रमांकासह नोंदणी करावी लागेल. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्यावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्यावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी लागेल, असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.