शिवसेना (Shiv Sena) नाव चोरलं. पण ठाकरे (Thackeray) हे नाव चोरता येणार नाही. सुपारी देऊन शिवसेना (Shiv Sena) संपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, काही झालं तरी शिवसेना संपवता येणार नाही. भाजप (BJP) ठरवून या गोष्टी करत आहे. शिवसेनेचा जन्म हा भाजपचे तळवे चाटण्यासाठी झाला नाही, असा खणखणीत निर्धार आणि इशारा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला आहे. मुंबई येथील शिवसेना भवन (Shiv Sena Bhawan) येथे एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. दरम्यान, या सर्व प्रकाराविरोधात आताच सर्वांनी एकत्र यायला हवे. अन्यथा आज जे शिवसेनेसोबत घडते आहे. तेच उद्या इतर पक्षांसोबत घडणार आहे. इतकेच नव्हे तर 2024 नंतर देशात निवडणुका तरी होतील की नाही, याची शंका आहे, अशी भीतीही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
उद्धव ठाकरे यांनी पुढे म्हटले की, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत दिलेला निर्णय चुकीचा आहे. मुळात निवडणुक आयुक्तांची निवड नाही तर नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दलची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. इतकेच नव्हे तर शिवसेनेबद्ल अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबीत असताना निवडणूक आयोगाला ही इतकी सगळी घाई करण्याची गरजच काय होती. न्यायालयात सुरु असलेल्या प्रक्रियेत आणखी गुंतागुंत निर्माण व्हावी यासाठीच निवडणूक आयोगाने हा सगळा घोळ घातला आहे. त्यासाठीच घाईघाईने निर्णय दिला आहे, असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे गटाची याचिका तातडीने दाखल करुन घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, काय म्हटले न्यायालय?)
ट्विट
Everything has been stolen from me. The name and symbol of our party have been stolen but the name 'Thackeray' cannot be stolen. We have moved the Supreme Court against the decision given by the Election Commission, the hearing will start from tomorrow: Uddhav Thackeray pic.twitter.com/1KoJ9Ustdu
— ANI (@ANI) February 20, 2023
निवडणूक आयोग बर्खास्त करण्यात यावा. निवडणुकीच्या माध्यमातून निवडणूक आयुक्त नेमण्यात यावे, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी या वेळी केली. निवडणूक आयोगाकडून कोणतीही आशा राहील नाही. आता केवळ सर्वोच्च न्यायालयच अखेरची आशा शिल्लख राहिली असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
ट्विट
The Election Commission only has control over the symbol of parties... EC panel should be dissolved, the matter is going on in the Supreme Court. I received calls from Sharad Pawar, Nitish Kumar and Mamata Banerjee: Uddhav Thackeray pic.twitter.com/7sno9egSwO
— ANI (@ANI) February 20, 2023
रावणाला शिवधनुष्य पेलले नाही. तर, ते मिंदेंना काय पेलणार. पण, मिंदेंच्या मुखवट्याच्या पाठीमागे भाजप नावाची जी महाशक्ती उभा राहिली आहे. त्याच्या माध्यमातून हे सगळे केले जात आहे.