महाराष्ट्रामध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता निवडणूक आयोगाने (Election Commission of India) मतदारयादीमध्ये (electoral list ) नावं वगळण्यात आलेल्यांना पुन्हा त्याचं नाव रजिस्टर करण्याची शेवटची संधी दिली आहे. आज आणि उद्या म्हणजे 23 आणि 24 फेब्रुवारी दिवशी निवडणूक आयोगाने ज्या मतदारांचे नाव यादीमध्ये नाही त्यांनी ते तपासून नाव नोंदणी करण्याचं आवाहन केलं आहे. सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारणार आहेत. यासोबतच ऑनलाईन स्वरूपातही नाव नोंदणी करण्याची सुविधा खुली ठेवण्यात आली आहे. यामुळे घरबसल्यादेखील मतदार नाव नोंदवू शकणार आहेत. राज्यातील 557 ग्रामपंचायतींसाठी 24 मार्च रोजी मतदान; सरपंचपदांच्या 82 रिक्त जागांसाठीही निवडणूक
ऑनलाईन स्वरूपात मतदार यादीमध्ये नाव कसं नोंदवाल?
मतदारांना www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाइन स्वरूपात नाव नोंदणीची सुविधा आहे. अधिक माहिती www.ceo.maharashtra.gov.in या वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाने 1950 हा टोल फ्री क्रमांकही नागरिकांना उपलब्ध करून दिला आहे. याच्या मदतीने देखील नागरिकांना मतदार यादीतील नाव तपासता येणार आहे.
ऑफलाईन स्वरूपात मतदार यादीमध्ये नाव कसं नोंदवाल?
सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरिकांचे नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारणार आहेत. त्यामुळे बीएलओंकडे नमुना क्र. 6, 7, 8 व 8A चे अर्ज उपलब्ध असतील. मतदारांना त्यांच्या सोयीनुसार आवश्यक फॉर्म उपलब्ध करून दिला जाईल. त्यानुसार यादीमध्ये बदल केले जातील.
नागरिकांना आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी 1 जानेवारी 2019 पर्यंत उपलब्ध अंतिम मतदार यादी बीएलओंकडे उपलब्ध असेल. या यादीमध्ये नाव नसलेल्यांना नाव नोंदवण्यासाठी आज आणि उद्याचा दिवस आहे.