एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड; शिवसेना आमदारांचे शिष्टमंडळ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार
Eknath Shinde Elected As Shiv Sena Legislature Party Leader | (Photo Credits: Twitter)

शिवसेना (Shiv Sena) आमदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची विधिंडळ नेता म्हणून एकमतने निवड केली आहे. तर, सुनील प्रभू यांची पक्षप्रतोद म्हणून निवड करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव दस्तुरखुद्ध शिवसेना आमदार आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांनीच मांडला होता. या प्रस्तावास शिवसेना आमदारांनी एकमताने पाठिंबा दिला. गटनेता म्हणून निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि शिवसेना मदारांचे एक मंडळ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेणार आहे. दरम्यान, ही भेट राजकीय नव्हे तर महाराष्ट्रातील ओला दुष्काळ, अवकाळी पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान, शेतकऱ्यांना मदत आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी घेण्यात येणार आहे.

शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, सुभाष देसाई , दिवाकर रावते , रामदास कदम विधिमंडळाचे शिवसेना गट नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित आणि सहयोगी आमदार आज (31 ऑक्टोबर 2019) दुपारी 3.30 वाजता राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल गत सिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. हे आमदार शिवसेना भवन येथील बैठक संपल्यावर थेट राजभवन येथे जाणार आहेत. (हेही वाचा, युती धर्माचं पालन करा, आता प्रस्ताव नको, थेट चर्चाच हवी; शिवसेनेने भाजपला खडसावले)

शिवसेना ट्विट

दरम्यान, शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपनेही काल (30 ऑक्टोबर 2019) आपल्या विधिमंडळ गटनेत्याची निवड केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप आमदारांनी एकमताने विधमंडळ नेता म्हणून निवड केली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्याला सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर 10 आमदारांनी अनुमोदन दिले.

शिवसेना ट्विट

दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही आपला विधिमंडळ गटनेता निवडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड विधिमंडळ गटनेता म्हणून करण्यात आली आहे.