राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्याचे चित्र निर्माण झाले आहेत. त्यात या कोरोनाच्या विळख्यात अनेक राजकीय नेते अडकत चालले असल्याचे समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती ऐकायला मिळते न मिळते तोच आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि त्यांच्या कन्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) हे देखील कोरोना बाधित (COVID-19 Positive) झाल्याचे समोर आले आहे. या दोघांनी ट्विटच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. तसेच आपली प्रकृती उत्तम असल्याचे या एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
"माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे, काळजीचे कारण नाही. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी मी विनंती करतो" असे एकनाथ खडसे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.हेदेखील वाचा- Jayant Patil Tests Positive for Covid19: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण
माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे, काळजीचे कारण नाही. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी मी विनंती करतो.
— Eknath Khadse (@EknathGKhadse) February 18, 2021
दरम्यान "रात्री अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड टेस्ट केली असता; माझा टेस्ट रिपोर्ट पोझिटिव्ह आला. गेल्या आठ दिवसात माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोविड चाचणी करुन घ्यावी. माझी प्रकृती स्थिर असून आपण सर्वांनी स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्यावी" अशी विनंती रक्षा खडसे यांनी केली आहे.
रात्री अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड टेस्ट केली असता; माझा टेस्ट रिपोर्ट पोझिटिव्ह आला, तरी गेल्या आठ दिवसात माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यानीं स्वतःची कोविड चाचणी करुन घ्यावी. माझी प्रकृती स्थिर असून आपण सर्वांनी स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्यावी.
— Raksha Khadse (@khadseraksha) February 18, 2021
महाविकास आघाडी सरकार मधील जलसंपदा मंत्री (Water Resources Minister) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज त्यांनी सोशल मीडियामध्ये ट्वीट करत ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान प्रकृती उत्तम असून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारा ते कामकाज सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.