Earthquake Tremors (Photo Credits-Pixabay)

मुंबई (Mumbai)  नजिक पालघरमध्ये आज पहाटे भूकंप जाणवल्यानंतर आता महाराष्ट्रात नाशिक (Nashik) परिसरालादेखील पुन्हा भूकंपाचा धक्का (Earthquake)  बसला आहे. नाशिकमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने एकावर एक भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. दरम्यान आज (11 सप्टेंबर) सकाळी बसलेला हा 3.6 रिश्टल स्केलचा होता. भूकंपाची तीव्रता सौम्य असली तरीही सातत्याने भूकंपाच्या झटक्याने शहर हादरत असल्याने आता नागरिकांच्या मनात भीती आहे. Earthquake in Mumbai: नॉर्थ मुंबईत पुन्हा एकदा जाणवले 3.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के.  

नाशिकमध्ये आज सकाळी सुमारे सात वाजून सहा मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला असल्याची माहिती National Centre for Seismology कडून देण्यात आली आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्याला पश्चिम दिशेच्या बाजूने 100 किमीच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.

ANI Tweet

8 सप्टेंबरला सकाळपासून दोनदा नाशिकला भूकंपाचा धक्का बसला होता. सकाळी 9.30 च्या सुमारास पहिला 3.8 रिश्टल स्केलच्या धक्क्यानंतर 10 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास दुसरा धक्का बसला. दरम्यान हा धक्का देखील नाशिकच्या पश्चिमेकडील भागात 103 किमी दूर होता. तसेच धक्क्याची तीव्रता ही 2.5 रिश्टल स्केलची होती.

9 सप्टेंबर दिवशी देखील सकाळी सव्वा चारच्या सुमारास पुन्हा 3.2 रिश्टल स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. सुदैवाची बाब म्हणजे या भूकंपांच्या धक्क्यांच्या मालिकेमध्ये भूकंपाचे धक्के सौम्य असल्याने कोणतीही जीवितहानी किंवा मोठी वित्त झाल्याचे वृत्त नाही.

दरम्यान, तीव्र भूकंपाचे धक्के जाणवल्यास नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखवणं गरजेचे आहे. दारं, खिडक्या किंवा उंच इमरातींपासून दूर रहावे. घरापासून बाहेर पडून मोकळ्या मैदानावर उभं रहा.     भूकंपाचे धक्के जाणवत असताना  तुम्ही जर लिफ्ट मध्ये असाल तर लगेच  बाहेर पडा जेणेकरुन तुम्हाला दुखापत होणार नाही.  गाडी चालवत असाल तर ती एका बाजूला लावून काही वेळ थांबा.