Uddhav Thackeray | (Facebook)

गेल्या काही आठवड्यांपासून शिवसेनेच्या (Shivsena) शिवाजी पार्कावरील दसरा मेळाव्याबाबत (Dussehra Rally) चर्चा सुरु आहे. याआधी उद्धव ठाकरे यांच्या गटाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी बीएमसीकडे परवानगीचा अर्ज केला होता, मात्र त्याबाबत अजूनतरी निर्णय झाला नाही. आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने परवानगी दिली अथवा नाही दिली तरी, पक्षाचा वार्षिक दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होणार असल्याचे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मंगळवारी सांगितले.

मुंबईचे माजी महापौर मिलिंद वैद्य यांच्या नेतृत्वाखालील सेना नेत्यांच्या शिष्टमंडळाने मेळाव्याची परवानगी मागणाऱ्या त्यांच्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी नागरी संस्थांच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, ‘आम्हाला परवानगी मिळो किंवा न मिळो, बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर जमतील. प्रशासन आम्हाला परवानगी देऊ अगर न देऊ आम्ही आमच्या निर्णयावर (शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याच्या) ठाम आहोत.’

ते पुढे म्हणाले, ‘जर आम्हाला उत्तर मिळाले नाही, तरी दसरा मेळाव्यासाठी बाळासाहेबांचे शिवसेना कार्यकर्ते शिवाजी पार्कवर जमतील.’ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गट आणि प्रतिस्पर्धी शिवसेना गट या दोघांनी मध्य मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मागितली आहे.

पर्याय म्हणून दोन्ही गटांनी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील एमएमआरडीए मैदानावर मेळावा घेण्याच्या परवानगीसाठी अर्जही केला होता. गेल्या आठवड्यात बीकेसी येथे सभा घेण्यास शिंदे गटाला परवानगी मिळाली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सेनेला शिवाजी पार्कवर मेळाव्यासाठी परवानगी मिळावी, परवानगी न मिळाल्यास त्यांनी कायद्याचा आधार घ्यावा.’ (हेही वाचा: Raj Thackeray on Foxconn: फॉक्सकॉन प्रकल्प गेलाच कसा? नेमकी काय बोलणी झाली? चौकशी करा; राज ठाकरे यांची मागणी)

ते पुढे म्हणाले, ‘शिंदे गटासाठी बीकेसी मैदान उपलब्ध करून दिले असेल, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी द्यावी. राज्याला दोन्ही पक्षांच्या आपापल्या मेळाव्यातील त्यांचे म्हणणे ऐकू द्या.’