Dussehra 2021: यंदा दसऱ्याला भाजप करणार मविआ सरकारच्या 'घोटाळ्यांच्या पुतळ्याचे दहन'
वसुली सरकारच्या घोटाळ्यांच्या पुतळ्याचे दहन (Photo Credits: Twitter)

यंदा दसऱ्या  (Dussehra) दिवशी भाजप (BJP) राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) घोटाळ्यांचं दहन करणार आहे. यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी ट्विट करत सर्वांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. उद्या दसऱ्याला म्हणजेच 15 ऑक्टोबरला मुलुंड येथे दुपारी 4.30 वाजता  महाराष्ट्राचा घोटाळेबाज सरकारच्या घोटाळ्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

मुलुंडच्या निलम नगर कार्यालयाजवळ हा कार्यक्रम होणार आहे. विशेष म्हणजे किरीट सोमय्या यांनी या ट्विटमध्ये वसूली सरकाररुपी रावणाचा फोटो जोडला असून त्यात विविध घोटाळ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. (Kirit Somaiya Criticizes Ajit Pawar: आयकर विभागाच्या कारवाईनंतर किरीट सोमय्या यांची अजित पवार यांच्यावर टीका)

किरीट सोमय्या ट्विट:

दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचं दहन करण्याची प्रथा आहे. भाजपने यंदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारला घोटाळेबाज सरकार म्हणत रावणाचे रुप दिले आहे आणि त्याचे दहन करण्याचे आयोजले आहे.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी केलेल्या ट्विटमध्ये गृहमंत्री 100 कोटी वसुली, साई रिसॉर्ट बांधकाम, जरंडेश्वर कारखाना, 2100 कोटींचा कोविड हॉस्पिटल, रेमडेसिविर कोविड घोटाळा, 900 कोटींचा दहिसर जमीन घोटाळा, कोल्हापूर साखर कारखाना, बालाजी पार्टिकल कारखाना, विहंग गार्डन ठाणे, दापोली अनधिकृत बंगलो, पोलिस आर.टी.ओ. ट्रान्सफर, सिटी बँक या 12 घोटाळ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.