आज देशभरात साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक दसऱ्याचा सण सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. आजच्या दिवशी शुभ काम करण्याची प्रथा परंपरेने चालत आली आहे. याच पार्श्वभुमीवर आज दादर मधील शिवाजी पार्कात (Shivaji Park) शिवसेनेचा (Shiv Sena) दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भव्य आयोजन केले असून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक शिवतिर्थावर आज उपस्थितीत राहणार आहे. पण आजच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. परंतु दसरा मेळाव्यादरम्यान दुपारी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत वाहतूकीच्या नियमात बदल करण्यात आले आहेत.
आज शिवतिर्थावर शिवगर्जना होणार असून उद्धव ठाकरे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या शिवसैनिकांना संबोधणार आहेत. या मेळाव्यात उद्धव ठाकरे विधानसभा निवडणूक, आरे वृक्ष तोड किंवा विधानसभेची रणनिती कशी असेल या महत्वाच्या मुद्द्यांवर बोलण्याची शक्यता आहे. परंतु दसरा मेळाव्यादरम्यान शिवाजी पार्कात वाहतूकीच्या नियमात बदल करण्यात आले असल्याचे मुंबई पोलिसांनी ट्वीट करत त्याची माहिती दिली आहे.(Dussehra 2019: महाराष्ट्रात आज 'या' 3 ठिकाणी दसरा मेळाव्याचे आयोजन; मोहन भागवत, उद्धव ठाकरे आणि अमित शहा काय बोलणार याकडे लक्ष)
मुंबई पोलीस ट्वीट:
Dear Mumbaikars,
Please be advised about the alternate routes and diversions in view of "Dussehra Melava " at Shivaji Park, Dadar on Dt. 08-10-2019 (Time 16 .00 to 24.00). pic.twitter.com/4ZYpP84g74
— Mumbai Police (@MumbaiPolice) October 8, 2019
तसेच शिवाजी पार्कात शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकता यावे यासाठी दोन मोठ्या स्क्रिन लावण्यात आल्या आहेत. परंतु वाहतूक कोंडीची अडचण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी वाहतूकीच्या मार्गात बदल केले असल्याची सूचना दिली आहे.