Dam | (Photo credit: ANI))

मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) हा पडत आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्खळीत झाले आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक शहर (Nashik Rain) परिसरासह जिल्ह्यातील बहुतांश भागांत दमदार पावसाची प्रतीक्षा अजूनही आहे. पण त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून शुक्रवार रोजी 539 क्यूसेकने विसर्ग सुरु करण्यात आला आहे.  (हेही वाचा - Nanded Rain: नांदेड जिल्ह्याला पूराचा फटला, 378 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले)

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नाशिकमध्ये गोदाघाट आणि रामकुंडाच्या परिसरामध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यंदा पावसाळ्यात पहिल्यांदाच गोदामाई प्रवाही झाली आहे. नाशिकमध्ये आलेले भाविकही गोदेच्या पाण्यात आनंद लुटताना पाहायला मिळत आहे. गंगापूर धरण जवळपास 74 टक्के भरले असून सद्यस्थितीमध्ये धरणातून 539 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जातोय. मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास धरणातून आणखी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गंगापूर धरणातून शुक्रवारी दुपारी 12 वाजता 539 क्यूसेकने पाणी सोडण्यात आले. तसेच पावसाचा जोर राहिल्यास विसर्ग टप्याटप्याने वाढवण्यात येईल, असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.