ऐन गर्दीच्या आज सकाळच्या वेळी मुंबईकरांची कामाची सुरुवात त्रासदायक ठरली आहे. याला निमित्त ठरले आहे मध्य रेल्वेवरील (Central Railway) विस्कळीत वाहतूक. कल्याण रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक उशिराने धावत आहे. मध्य रेल्वेवर मुंबईकडे येणारी वाहतूक ही 20 मिनिटे उशिराने धावत आहे. तसेच मुंबईकडे येणा-या एक्सप्रेसही उशिराने धावत आहे. कल्याण (Kalyan) स्थानकाजवळ झालेल्या तांत्रिक बिघाडाच्या दुरुस्तीचे काम सुरु असून लवकरात वाहतूक सुरळीत सुरु होईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेवरील या बिघाडामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तसेच रेल्वे फलाटावरील प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. प्रवाशांनी गोंधळून न जाता मध्य रेल्वेला सहकार्य करावे असे सांगण्यात येत आहे. खुशखबर! मुंबई लोकल चे पर्यटक तिकीट घेऊन, तिन्ही लाईन्सवर हवा तेव्हा प्रवास करता येणार
या तांत्रिक बिघाडाचा फटका मुंबईकडे येणा-या एक्सप्रेसवरील झाला आहे. लोकल रेल्वेसह मुंबईकडे येणारी एक्सप्रेस वाहतूक ही 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहे. मुंबईकरांची सकाळची वेळ ही कामाची आणि गर्दीची वेळ असते. घराबाहेर पडलेले लाखो चाकरमानी रेल्वेने प्रवास करतात. मात्र आज सकाळीच झालेल्या या बिघाडामुळे रेल्वे प्रवाशांची दैना उडाली आहे.
20 ते 25 मिनिटे रेल्वे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना निश्चित स्थळी पाहोचण्यासाठीही उशीर होत आहे. बिघाड दुरुस्तीचे काम सुरु असून लवकरात लवकर रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करु असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
यापुढे प्रवाशांनी एक पर्यटक तिकीट (Tourist Ticket) काढल्यास त्यांना लोकलच्या तिन्ही मार्गावरून केव्हाही आणि कितीही प्रवास (Unlimited Travel) करता येऊ शकणार आहे. तूर्तास या तिकिटाची वैधता 1 ते 5 दिवसांपर्यंत मर्यादित असणार आहे त्यासाठी वेगवेगळे शुल्क आकारण्यात येतील.