![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/11/Amruta-Fadnavis-Nawab-Malik-380x214.jpg)
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरण (Mumbai Cruise Drugs Case) आणि आर्यन खान प्रकरणात नवाब मलिक यांनी रान उठवले आहे. दरम्यान, या प्रकरणात मलीक यांनी अमृता फडणवीस आणि जयदीप राणा (Jaydeep Rana) यांचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. जयदीप राणा हा गृहस्थ ड्रग पेडलर असल्याचे मलिक यांनी फोटोसोबत केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते.
नवाब मलिक यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोवरुन आक्रमक होत अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच, ट्विटरच्या माध्यमातून अमृता यांनी नवाब मलिक यांना इशारा दिला आहे की, मानहानी आणि दिशाभूल करणारे ट्विट येत्या 48 तासात डिलिट करा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा. (हेही वाचा, Nawab Malik On BJP: गुजरात ड्रग्ज रॅकेटचं केंद्र बनू लागलंय का? नवाब मलिक यांचा भाजपवर पुन्हा निशाणा)
ट्विट
Amruta Devendra Fadnavis, the wife of former Maharashtra CM Devendra Fadnavis, sends legal notice to Maharashtra minister Nawab Malik for 'tarnishing the image of her family' through his alleged defamatory tweets
— ANI (@ANI) November 11, 2021
ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादानेच ड्रग्जचा उद्योग सुरु होता. अमृता फडणवीस यांनी गायलेल्या रिव्हर अँथममध्ये जयदीप राणा हा फायनान्सर होता. या गाण्यात अमृता फडणवीस यांचा आवाज आणि देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार यांचा अभिनय होता. जयदीप राणा हा ड्रग्ज पेडलर आहे, असा दावा मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. मलिक यांनीक केलेल्या ट्विटमुळे अमृता फडणवीस चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान, नवाब मलिक यांना आलेल्या नोटीशीचे काही फोटोही अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन शेअर केले आहेत.