
Dr. Shirish Valsangkar: न्यूरो फिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी काही दिवसांपूर्वी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येने सर्वांनाच हादरवून सोडले होते. 18 एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या (Dr. Shirish Valsangkar suicide) केली. मागील 15 वर्षांत डॉ. शिरीष वळसंगकर यांनी म्युच्युअल फंडात 160 कोटीची रक्कम गुंतवल्याची माहिती समोर आली होती. ही गुंतवणूक एसआयपी या पद्धतीने केली गेली होती. शेअर बाजाराच्या अनुषंगाने आता त्यांच्या या गुंतवणीकीचे पैसे वारसांनी मिळती. एकूण 300 कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम मिळणे शक्य असल्याचे गुंतवणूक तज्ज्ञांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. शिरीष वळसंगकरांनी म्युच्युअल फंडात गेल्या 15 वर्षांत तब्बल 160 कोटी रुपये गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे.
300 कोटी मिळण्याचा गुंतवणूक तज्ञांचा अंदाज
गुंतवणूक तज्ज्ञांचा अंदाजानुसार जर कोणी व्यक्ती गेल्या 15 वर्षांत गुंतवणूक करत असेल आणि ती रक्कम 160 कोटींच्या घरात असेल. तर नक्कीच त्याचे प्रोफीट 300 कोटी किंवा त्याहून अधिक मिळणे शक्य आहे. मात्र, अद्याप डॉ. शिरीष वळसंगकरांचे मृत्युपत्र समोर आलेले नाही. त्यामुळे ही रक्कम कोणाला मिळणार हे अस्पष्ट आहे. वारस म्हणजेच नॉमिनी म्हणून कोणाच्या नावाची नोंद केली आहे हे माहित नाही. एवढी मोठी रकमेचे मालक कोण होणार याची उत्सुकता आहे.
आत्महत्येमुळे सर्वांनाच धक्का बसला
न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मृत्यूने राज्यातील वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. 18 एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आपल्या आयुष्याची अखेर केली. सोलापूरमधील पहिले न्युरोफिजिशियन म्हणून डॉ. वळसंगकर यांची ख्याती होती. रुग्णसेवेसोबत ते समाजसेवा करत होते. अनेक रुग्णांवर मोफत उपचार देखील केले होते. शांत, संयमी स्वभावच्या डॉ. शिरीष वळसंगकरांनी अनेक रुग्णांना लळा लावला होता. डॉ वळसंगकरांच्या आत्महत्येने वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे.