Dr. Babasaheb Ambedkar Memorial In Indu Mills: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीसाठी नवी कार्यक्रम पत्रिका बनवण्यासह सर्व महत्वाच्या मान्यवरांना आंमत्रित करण्याचे MMRDA ला निर्देशन- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची पायाभऱणी (Photo Credits-Twitter)

आज दादर मधील इंदु मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पाडणार होता. पण तो पायभरणीसाठी देण्यात आलेल्या मान्यवरांच्या निमंत्रणाच्या वादावरुन तो रद्द झाल्याचे दिसून आले. याच पार्श्वभुमीवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणी संदर्भात एक महत्वाची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी असे म्हटले आहे की, पुतळ्याच्या पायाभरणीसाठी आता नवी कार्यक्रम पत्रिका तयार करा. तसेच या कार्यक्रमासाठी सर्व महत्वाच्या मान्यवरांना आंमत्रित करण्याचे निर्देशन एमएमआरडीए (MMRDA) यांना देण्यात आले आहेत.

इंदू मिल मधील आंबेडकरांच्या पुतळ्याच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी काही जणांना आमंत्रण न दिल्याने त्यांच्यात नाराजी दिसून आली. यासाठी फक्त 16 जणांनाच आमंत्रण दिले गेले होते. याच कारणास्तव आता उद्धव ठाकरे यांनी सर्व महत्वांच्या मान्यवरांना काही दिवसांनी पार पडणाऱ्या पुतळ्याच्या पायाभरणीसाठी आमंत्रण द्यावे असे स्पष्ट केले आहे. तसेच कोणीही या मुद्द्यावरुन राजकरण करु नये असे ही म्हटले आहे.(Dr. Babasaheb Ambedkar Memorial In Indu Mills: इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम पुढे ढकलला)

 Tweet:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यदिव्य असे स्मारक उभारण्याची सर्वांचीच इच्छा आहे. त्यामुळे यामध्ये कोणताही पक्ष-संघटना असा भेदभाव असू शकत नाही असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्याचसोबत राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंततर पुतळ्याच्या सुधारित दृष्टीने एमएमआरडीएने सर्व तयारी करण्यासह नियोजन ही केले आहे. अशा महत्वाच्या कार्यक्रमाला सर्व मान्यवरांची उपस्थिती असणे गरजेचे आहे.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम इंदू मिल येथे आज दुपारी 3 वाजता पार पडणार होता. पण या क्रार्यक्रमासाठी फक्त 16 जणांना आमंत्रित केल्याने अन्य काही जणांमध्ये नाराजीचे सूर दिसून आले. कार्यक्रमासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्र्यांना बोलावण्यात आले होते. पण नंतर या आमंत्रणामध्ये बाबासाहेबांचे पणतू आनंदराज आंबेडकर यांना आमंत्रण पाठवले गेले.