![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/07/Ajit-Pawar-123-380x214.jpg)
लॉकडाऊनमुळे राज्यात अनेक निर्बंध लादण्यात आले असून बाहेर विनाकारण फिरणा-यांना देखील पोलिसांचा दंडुक्यांचा मार खावा लागतोय. दरम्यान लग्न करणा-यांना कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्याचे निर्बंध घालण्यात आल्याने नवविवाहित दाम्पत्यांच्या आनंदावर आधीच विरजण आले आहेत. त्यात आणखी प्रीवेडिंग शूटसाठी (Pre-Wedding Shoot) येणा-यांना अडवू नका, हनिमूनसाठी पण इथेच आले पाहिजेत असं सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी पोलिसांना सल्ला दिला आहे. जोडप्यांना चांगली वागणूक द्या असेही ते म्हणाले आहे. अजित पवार रायगड-श्रीवर्धन दौऱ्यावर असून यावेळी कार्यक्रमातील भाषणादरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
"आजकाल लग्न ठरलं की प्रीवेडिंग शूटिंग केलं जातं. यासाठी अनेक मुलं मुली श्रीवर्धनमध्ये येतात. शूटिंगसाठी येणाऱ्या या मुलांमध्ये वाद झाल्याचं ऐकायला येत. त्यांना इथे रोखलं जातं. ही प्रकरणं पोलीस ठाण्यापर्यंत जातात. पण तसं करु नका. प्रीवेडिंगला आलेल्या जोडप्याला इतकी चांगली वागणूक द्या की नंतर त्यांनी हनिमूनलाही येथेच आलं पाहिजे. हनिमून झाल्यावर लग्नाच्या पहिल्या वाढदिवसालाही येथेच आलं पाहिजे. त्यासाठी मार्गदर्शन, सहकार्य, संरक्षण द्यायला हवं. यामुळे उत्पन्नाचं साधन तयार होईल," असं अजित पवार म्हणाले.हेदेखील वाचा- आरक्षण ते अनलॉक वरून गदारोळ यावरून देवेंद्र फडणवीस यांचे राज्य सरकार वर टीकास्त्र
"कोकणाबद्दल शरद पवारांनाही आत्मियता आहे. या भूमीवर त्यांचं खूप प्रेम आहे. या परिसराचा कॅलिफोर्निया करण्याची त्यांची इच्छा आहे. कोकण रेल्वे शरद पवारांच्या दूरच्या दृष्टीने मधु दंडवतेंची मदत घेऊन आली. त्यावेळी पहिल्यांदाच राज्य सरकारच्या वतीने निधी देण्याचं काम शरद पवारांनी केलं,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं. “शरद पवारांनी अनेक हल्ले, वादळं, दुष्काळ, गारपीट पाहिली, पण त्यातून न डगमगता राज्यातील जनतेला उभं करण्याचं काम केलं,” असंही ते म्हणाले.