मुंबईतील एसी लोकलवर पुन्हा एकदा एका माथेफिरुन दगडफेक केल्याची घटना ही घडली आहे. ठाकुर्ली-डोंबिवली स्थानकादरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलवर ही दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शरद गांगुर्डेला अटक केली आहे. आरोपीने मंद्यधुंद अवस्थेत दगडफेक केल्याची समोर आले असून यापुर्वीही त्यांने अनेकदा ट्रेनवर दगड केल्याचेही समोर आले आहे. सकाळी 9.20 ला ठाकुर्ली ते डोंबिवली स्थानकादरम्यान ही घटना घडली. डोंबिवली आरपीएफ टीमने या घटनेबद्दल माहिती दिली. (हेही वाचा - Mumbai Accident: वांद्रे सी-लिंकवर रस्ता अपघात, टोलनाक्यावर उभ्या असलेल्या वाहनांना भरधाव कारची धडक, तिघे ठार)
या दगडफेकीत एसी लोकलच्या खिडकीची काच फुटली. यामुळे खिडकीच्या बाजूला बसलेल्या महिलेला किरकोळ जखम झाली. आरोपीबद्दल ट्रेनमधील प्रवाशांने आरपीएफने माहिती दिल्यानंतर सहाय्यक निरीक्षक रंजन शिंदे आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहचली. त्यांनी शरदला रुळाजवळ पाहिले. तो पळून जात असताना त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतलं. आरोपी दादरच्या एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
शरद दारुच्या नशेत सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास डोंबिवली ते ठाकुर्ली रेल्वेरुळावरुन सीएसएमटीकडे जात होता. लोकलचा हॉर्न वाजल्यानंतर त्याने दगड उचलला आणि ट्रेनवर फेकण्यास सुरूवात केली. आरोपी शरदला रेल्वे कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली.