डोंबिवली (Dombiwali) जवळील खोणी पलावा (Khoni Palava) येथील ऑरेलिया इमारतीच्या सातव्या माजल्यावर आग लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. इमारतीमधील रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आहे. सातव्या माळ्यावर बाल्कनीत ठेवलेल्या वॉशिंग मशीनमध्ये शॉर्टसर्किट (Shock Ciruit) झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. दरम्यान आग लागल्यामुळे परिसरात थोडा ेवेळ भीतीचे साम्राज्य पसरलेले पहायला मिळाले. यावेळी परिसरातील आकाश काळा धुरांनी देखील वेढलेले काही काळ होते.
पाहा व्हिडिओ -
#Dombiwali इलाके में एक बहुमंजिला रिहायशी इमारत में आग लगने की घटना सामने आई है. डोंबिवली के पास खोनी पलावा के डाऊन टाऊन इमारत में शार्ट सर्किट होने के बाद भीषण आग लग गई.
आग लगने की घटना में किसी के हताहत होने की खबर नहीं है और फायर ब्रिगेड की गाड़ियां मौके पर पहुंचकर आग… pic.twitter.com/XNBx1HuP7p
— Zee Business (@ZeeBusiness) January 13, 2024
अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग लागलेली इमारत ही 18 मजल्याची असून आठव्या मजल्यावर आग लागली, त्यानंतर गच्चीपर्यंत आग पसरलीय. ही आग इमारतीला लागून असलेल्या इमारतीच्या डकमध्ये पसरली. डकमधून चार-पाच मजल्यापर्यंत ही आग गेली होती. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवलं.