Dog Attack: गेल्या अनेक दिवसांपासून शहरात कुत्र्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान गोव्यातील एका अल्पवयीन मुलाला एका पाळीव कुत्र्याने चावा घेतल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पाळीव कुत्र्याच्या मालकावर आणि केअरटेकर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाळीव कुत्रा हा रॉटवेलर जातीचा असल्याचे तक्रारीत सांगितले. कुत्र्याला हाताळण्यात निष्काजीपणा केल्याने लहानग्या मुलीला त्याने चावा घेतला अशा आरोपी करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यातील कमुरलिम बर्देझ येथील ही घटना आहे. पांडुरंग खोर्जुवेकर या नावाच्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, मालकाने आणि केअर टेकरने रॉटवेलरला बांधून न ठेवता त्याला मोकळे सोडले होते. दरम्यान दहा वर्षाच्या मुलीला चावा घेतला. रोटवेलरचा मालक सिध्दार्थ खोरजुवेकर आणि कुत्र्याचा सांभाळ करणारा अनिकेत खोर्जुवेकर (२६) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहे. मात्र, कुत्र्याकडे लक्ष न देता घराच्या गेटच्या बाहेर जाऊन तेथून जात असलेल्या अल्पवयीन मुलीला चावा घेतला.
पोलिसांनी कुत्र्याचा मालक आणि देखभाल करणार्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 289 आणि 336 नुसार गुन्हे नोंदवले आहेत. पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी सांगितले की, तपासादरम्यान रॉटवेलरची करसवाडा येथील पशुवैद्यकीय सेवा संचालनालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. कुत्र्याचा ताबा पशुवैद्यकीय सेवा संचालनालयाकडे सोपवण्यासाठी आवश्यक औपचारिकता पार पाडली जात असल्याचे त्यांनी सांगितले.