PMC Bank Crisis मुळे तणावात असलेल्या डॉक्टर बॅंक खातेदाराची आत्महत्या?  मुंबई पोलिसांनी फेटाळला दावा
Suicide | File Image

मुंबईमध्ये सध्या पीएमसी बॅंकेवर (PMC Bank) आरबीआयकडून (RBI) घालण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे अनेक बॅंक खातेदार तणावाखाली आहेत. दरम्यान पीएमसी बॅंकेमध्ये पैसे अडकल्याने दोन खातेदारांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यानंतर आता 39 वर्षीय डॉक्टर महिलेनेदेखील पीएमसी बॅंकेमध्ये पैसे अडकल्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील वर्सोवा (Versova) भागामध्ये तिच्या राहत्या घरीच आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मात्र पोलिसांनी या आत्महत्येमध्ये पीएमसी बॅंक घोटाळ्याचा ताण असल्याच्या संबंधांच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. PMC Bank Crisis: 24 तासांत अजून एका बॅंक खातेदाराचा मृत्यू; मीडिया रिपोर्ट्स चा दावा

निवेदिता बिजलानी असं या मृत डॉक्टर महिलेचे नाव आहे. त्या वडिलांसोबत वर्सोवा परिसरात राहत होत्या. सोमवार ( 14 ऑक्टोबर) रात्री निवेदिता यांनी झोपेच्या गोळ्यांचा ओव्हर डोस घेतल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. त्यांचे बॅंकेमध्ये 1 कोटी रूपयांचे डिपॉझिट्स होते. पीएमसी बॅंकेमध्ये त्यांचे अकाऊंट होते. PMC बँक खातेधारकांसाठी दिलासादायक बातमी! आता 25 हजार ऐवजी काढता येणार 40 हजार रुपये , RBI कडून निर्णय जाहीर.

मागील काही दिवसांपासून बिजलानी नैराश्याचा सामना करत होत्या, अमेरिकेमध्ये असताना मागील वर्षीदेखील त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. काही काळ त्यांनी अमेरिकेमध्ये डॉक्टर म्हणून काम केले आहे. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे.

पीएमसीकडून एचडीआयएलला (HDIL) कर्ज देण्यात आले होते, मात्र एचडीआयएलने कर्जाची रक्कम वेळेत न भरल्याने पीएमसी बँक आणि बँकेतील खातेदार आता अडचणीत आले आहेत.बँकेला 4355.43 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याबद्दल सध्या पोलिस स्थानकामध्ये बॅंकेतील वरिष्ठ अधिकारी विरूद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे.