बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आणि भूम परांडा वाशी मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील (Dnyaneshwar Patil) यांचे निधन झाले आहे. पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic Pune) मध्ये उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले आहे. ज्ञानेश्वर यांना फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाल्याने हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. आज सकाळी 11 च्या सुमारास परंडा येथे ज्ञानेश्वर पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार्यांपैकी एक धाराशिवचे ज्ञानेश्वर पाटील होते. त्यांचा ग्रामीण भागामध्ये मोठा जनसंपर्क आहे. आगामी विधानसभा निवडणूकांसाठी ते तयारीला लागले असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. दरम्यान राजकारणामध्ये त्यांची सुरूवात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून झाली आहे. जीप चालक असलेले ज्ञानेश्वर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झाले होते. त्यानंतर त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. 1995 आणि 1999 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकत आमदारकी मिळवली होती. आता त्यांच्या निधनाचं वृत्त ऐकून परंडा मतदारसंघात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली
माझ्या राजकीय आयुष्यात कधी वडीलकीची,,कधी भावाची, कधी मित्राची व कधी नेत्याची साथ देणारे आमचे मार्गदर्शक माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचं अल्पशा आजाराने निधन झालं
सर्वसामान्य कुटुंबातून आमदार की पर्यंत मजल मारून शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेब… pic.twitter.com/tG2XgVA2JE
— Omprakash Rajenimbalkar (@OmRajenimbalkr) October 3, 2024
महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदारकी मिळवण्यापूर्वी ज्ञानेश्वर नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आले होते. संघटने मध्येही त्यांनी दांडग्या जनसंपर्काच्या जोरावर अनेक पदं भूषवली आहेत.
आज भोत्रा रोडवरील शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनाला ठेवले जाईल.