Pune News: पुण्यातील घटना या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. तेथे कोणत्या कारणावरून भांडण (Neighbors Dispute in Pune)होईल याचा काही नेम नाही असं म्हणता येईल अशी एक घटना नुकतीच समोर आली आहे. भल्यापहाटे दोन मालक एकमेकांमध्ये भिडले. त्या दोघांच्या वादामुळे शेजारी राहणाऱ्यांना प्रचंड त्रास झाला. त्यामुळे या नागरिकांनी संताप व्यक्त केला. या संपूर्ण प्रकरणाचे सीसीटीव्ही समोर आले आहे. वादाचे कारण ठरले ते म्हणजे दोन्ही घराचे पाळीव कुत्रे. कुत्र्यावरून सुरू झालेला क्षुल्लक वाद थेट पोलिस स्टेशनपर्यंत (Hadapsar Police Station) पोहचला. (हेही वाचा:Karnatak Dog Accident: रस्ता ओलांडताना कुत्र्याच्या पिल्लाला दुचाकीची धडक, गुन्हा दाखल (Watch Vidoe) )
मिळालेल्या माहितीनुसार, मगरपट्टा परिसरात ही घटना घडली. अमेरिकन पिटबुल या श्वानाच्या जातीने दुसऱ्या श्वानावर हल्ला केला. त्यामुळे या दोन्ही श्वानाच्या मालकांमध्ये तुफान राडा झाला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या संदर्भात हडपसर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. एकूण काय तर, कुत्र्यावरून सुरू झालेला क्षुल्लक वाद थेट पोलिस स्टेशनपर्यंत पोहचला.
दोन्ही श्वान मालकामध्ये हल्ल्यावरून वाद झाला. मुळात पिटबुल ही घातक श्वानाची प्रजाती आहे. पिटबुलला बंदी असतानाही मगरपट्टा परिसरात अशा घातक श्वानांच्या जाती अनेक लोक पाळतात. त्यामुळे तेथील रहिवासी संतप्त झाले होते. बाबुळ गार्डन येथील एका बंगल्यात असणाऱ्या श्वान मालकाबरोबर शेजारच्या वाद झाला. अमेरिकन पिटबुल नावाचा श्वान दुसऱ्या श्वानाला चावल्याने शेजारील नागरिकांनी श्वान मालकाच्या घरात जाऊन विचारपूस केली. यावेळी पिटबुल श्वानाच्या घरातील महिलांनी आरडाओरडा करत वाद घातला.
व्हिडीओ पहा
पुण्यात कुत्र्यांमुळे तुफान राडा झाला. तुमचा कुत्रा आमच्या श्वानाला चावला, असं म्हणत दोन मालक एकमेकांमध्ये भिडले#pune #dog #video #shocking #maharashtra pic.twitter.com/XkIqvOmHhx
— Satish Daud Patil (@Satish_Daud) August 6, 2024
श्वानामुळे झालेला हा संपूर्ण वाद सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. हडपसर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करताना आम्ही आमच्या घरात सुरक्षित नाही असे कारण असे तक्रारदाराने म्हटले. पाळीव प्राणी आणि त्याचे मालक यांचा त्रास आम्हाला सहन करावा लागतो, असे देखील त्याने पुढे म्हटले आहे.